MLA Sarfaraz Ahmad, CM Hemant Soren, Kalpana Soren Sarkarnama
देश

MLA Sarfaraz Ahmad : मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसाठी दिला आमदारकीचा राजीनामा?

Kalpana Soren : कल्पना सोरेन पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता...

Rajanand More

Jharkhand News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जय्यत तयारी सुरू असताना झारखंडमध्येही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये एका आमदाराने तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीसाठी राजीनामा दिल्याचे जोरदार चर्चा सुरू आहे.

झारखंडमध्ये हेमंत सोरेन (CM Hemat Soren) हे मुख्यमंत्री असून त्यांच्याच पक्षाचे आमदार सरफराज अहमद (MLA Sarfaraz Ahmad) यांनी सोमवारी राजीनामा दिला आहे. नवीन वर्षातील पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला आहे. ते गांडेय विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकांना (Assembly Election) अजून वर्षभराचा कालावधी असला तरी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी कल्पना सोरेन (Kalpana Soren) त्याआधीपासून राजकारणात सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. यापार्श्वभूमीवर अहमद यांच्या जागेवर त्यांना उमेदवारी मिळू शकते. पोटनिवडणुकीमध्ये (Bypoll) त्याच उमेदवार असतील, असा शक्यता व्यक्त केली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

झारखंड मुक्ती मोर्चाकडून (JMM) याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पक्षाचे केंद्रीय महासचिव विनोद पांडे (Vinod Pandey) यांनी सांगितले की, राजीनामाची माहिती पक्षाला मिळाली आहे. पण त्यांनी राजीनामा का दिला, त्यामागेच काय कारण आहे, हे तेच सांगू शकतील, असे सांगत पांडे यांनी संभ्रम निर्माण केला. पक्षात नाराजी नसल्याचेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, सरफराज यांच्या राजीनाम्यावर भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे. खासदार निशीकांत दुबे यांनी आता हेमंत सोरेन हे राजानामा देतील आणि त्यांच्या पत्नी मुख्यमंत्री होतील, असे ट्विट केले आहे. दुबे यांच्या या पोस्टमुळे कल्पना सोरेन या पोटनिवडणूक लढवू शकतात, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. हेमंत सोरेन यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाल्यास कल्पना सोरेन मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा मागील काही महिन्यांपासून सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT