देश

BJP MLA news : विधानसभेत मुख्यमंत्री बोलत असतानाच भाजपच्या महिला आमदारांना रडू कोसळलं! हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ...

RG Kar Case, Suvendu Adhikari, Ratna Debnath : तृणमूल काँग्रेस सत्तेत असताना आरजी कर रुग्णालयात ता. ९ ऑगस्ट २०२४ रोजी 'अभया' (पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टर) हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती.

Rajanand More

West Bengal Assembly : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतरच विधिमंडळाचे पहिलेच अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनातीह एक हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्यो सोशल मीडियात व्हायरल होते. हत्या करण्यात आलेल्या आपल्या मुलीला न्याय मिळावा, यासाठी झगडणाऱ्या आमदार आईचा हा टाहो होता. न्याय नक्की मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांकडून दिला जात असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.

कोलकाता येथील आरजी कर बलात्कार-हत्या प्रकरणाचा मुद्दा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ऐरणीवर आले होते. त्यानंतर आता विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी याप्रकरणी पीडितेला न्याय मिळेल, असे आश्वासन विधानसभेत दिले. पीडितेच्या आई रत्ना देबनाथ या भाजपच्या तिकीटावर पानीहाटी मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. त्याही यावेळी विधानसभेत उपस्थित होत्या.

मुख्यमंत्र्‍यांकडून आपल्या मुलीला न्याय देण्याबाबतचे विधान ऐकताच देबनाथ यांना रडू कोसळलं. त्यांच्या शेजारी बसलेल्या महिला आमदाराने त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी अन्य आमदार भावूक झाले होते. विधानसभेतून बाहेर पडल्यानंतर पीटीआयशी बोलताना देबनाथ यांनी माझ्या मुलीला न्याय मिळेल, अशी आशा व्यक्त केली. मी इथे सत्तेसाठी नाही तर आपल्या मुलीच्या न्यायासाठी आले आहे, असेही त्या म्हणाल्या.

तृणमूल काँग्रेस सत्तेत असताना आरजी कर रुग्णालयात ता. ९ ऑगस्ट २०२४ रोजी 'अभया' (पीडित प्रशिक्षणार्थी डॉक्टर) हिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. सरकारकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या प्रकरणाची सीबीआयकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

सुवेंदू अधिकारी यांनी विधानसभेत बोलताना राज्यातील अनेक महिला अत्याचारांच्या घटनांचा उल्लेख केला होता. महिलांवरील अत्याचाराला आता खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी विधानसभेत दिला आहे. राज्यात आरजी कर प्रकरणाच्या मुद्द्यावरून तत्कालीन सरकारला घेरण्यात आले होते. ममता बॅनर्जी यांची सत्ता जाण्यामागे हे प्रकरणही कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT