Rishi Sunak Sarkarnama
देश

Rishi Sunak : ऋषी सुनक यांच्या रूपाने भारतीय वंशाची दुसरी व्यक्ती पंतप्रधानपदी!

Rishi Sunak : माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सुनक यांचा पराभव केला होता. यामुळे सुनक यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली होती.

सरकारनामा ब्यूरो

लंडन : ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा दावा फेटाळल्यानंतर पंतप्रधानपदासाठी ऋषी सुनक यांचा मार्ग मोकळा झाला. ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते म्हणून घोषणा करण्यात आली. यानंतर सुनक यांची ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून अधिकृत घोषणा झाली. यामुळे आता एक भारतीय वंशाच्या व्यक्तीला ब्रिटनच्या पंतप्रधानबदावर बसण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, भारतीय वंशाच्या व्यक्तीची एखाद्या देशाचे प्रमुखपद भूषविण्याची ही दुसरी संधी आहे. या आधी मूळचे कोकणातील असलेल्या लिओ वराडकर यांची आयर्लंडचे पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

मागील दिड महिन्यापूर्वी, माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी सुनक यांचा पराभव केला होता. यामुळे सुनक यांची पंतप्रधानपदाची संधी हुकली होती. तेव्हा ट्रस यांना 57.4 टक्के आणि सुनक यांना 42.6 टक्के मते मिळाली होती. मात्र, ट्रस यांनी राजीनामा दिल्यानंतर सुनक यांना संधी मिळाली. ऋषी सुनक यांचे आजोबा पंजाबमधून ब्रिटनला पोहोचले होते. इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत.

ऋषी सुनक हे ४२ वर्षाचे आहेत. 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता मूर्ती यांच्याशी त्यांनी विवाह केला आहे. ते हुजूर म्हणजेच कंझर्वेटिव्ह पक्षाचे खासदार आहेत. त्यांनी राजशास्त्र व अर्थशास्त्र पदवीचे शिक्षण घेतले आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीए पूर्ण केले आहे. बँकींग गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून त्यांनी काम केले आहे.

सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी ब्रिटनमध्ये झाला. भारतीय पंजाबी हिंदू यशवीर सुनक आणि उषा सुनक यांच्यापोटी झाला.तीन भावंडांमध्ये ते सर्वात मोठे. त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये तर आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतात झाला.1960 च्या दशकात ते त्यांच्या मुलांसह पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये गेले होते. त्यांचे वडील यशवीर हे जनरल प्रॅक्टिशनर होते आणि त्यांची आईने फार्मासिस्ट म्हणून काम केले.

सुनक यांचा जन्म 12 मे 1980 रोजी ब्रिटनमध्ये झाला. भारतीय पंजाबी हिंदू यशवीर सुनक आणि उषा सुनक यांच्यापोटी झाला.तीन भावंडांमध्ये ते सर्वात मोठे. त्यांचे वडील यशवीर यांचा जन्म केनियामध्ये तर आई उषा यांचा जन्म टांझानियामध्ये झाला होता. त्यांच्या आजी-आजोबांचा जन्म भारतातील पंजाब प्रांतात झाला.1960 च्या दशकात ते त्यांच्या मुलांसह पूर्व आफ्रिकेतून ब्रिटनमध्ये गेले होते. त्यांचे वडील यशवीर हे जनरल प्रॅक्टिशनर होते आणि त्यांची आईने फार्मासिस्ट म्हणून काम केले.

आता सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. २८ ऑक्टोबर रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. सुनक यांच्या रूपाने दुसऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची जगातल्या इतर देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

याआधी लिओ वराडकर यांची आयर्लंड या देशातच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती.याआधी युरोपातल्या आयर्लंड या देशाच्या पंतप्रधानपदी मूळ कोकणचे असलेले भारतीय वंशाचे लिओ वराडकर यांची निवड झाली होती.वराडकर यांचे वडिलांचे नाव

अशोक वराडकर असे आहे. ते व्यावसायिक डॉक्टर होते. 1960 सालच्या दरम्यान अशोक वराडकर भारतातून आपले बस्तान गुंडाळून सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये दाखल झाले

होते. इंग्लंडमध्ये मरियम नावाच्या आयरिश वंशीय महिलेशी लग्न केले. मरियम या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. 70 च्या दशकात हे दाम्पत्य इंग्लंडमधून आयर्लंडला वास्तव्याला गेले. या दरम्यान त्यांना एका मुलाला जन्म दिला. 18 जानेवारी 1979 मध्ये आयर्लंडची राजधानी असलेल्या डब्लिनमध्ये लिओ यांचा जन्म झाला.

वैद्यकीय व्यवसाय सुरू असताना ते राजकारणाकडेही आकर्षित झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी लिओ यांनी पहिली निवडणूक लढवली होती. मात्र, यात त्यांना यश मिळाले नाही. त्यांचा पराभव झाला. यानंतर त्यांच्या राजकीय कार्यकिर्दीने वेग पकडला. वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी लिओ आयर्लंड संसदेचे सदस्य बनले. 2011 ते 2013 या दरम्यान, वाहतूक, पर्यटन आणि क्रीडा मंत्रिपदची धुरा सांभाळली. 2014 ते 2016 दरम्यान ते आरोग्यमंत्रीसुद्धा राहिले होते.

२०१७ साली फाइन गेल पक्षाकडून लिओ यांनी प्रतिस्पर्धी सिमोन कोव्हिने यांचा दणदणीत पराभव केला. यानंतर ते आयर्लंडच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी सर्वात तरूण म्हणून शपथ घेतली.

मात्र, २०२० मध्ये आयर्लंडमध्ये झालेल्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत कोणालाच मिळाले नाही. यामुळे आयर्लंडमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीप्रमाणेच तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. तिघांमध्ये ठरलेल्या सत्तेच्या सूत्रानुसार आता मायकेल मार्टिन हे आयर्लंडचे पंतप्रधान, तर लिओ अशोक वराडकर हे उपपंतप्रधान झाले.

अडीच वर्षांनंतर डिसेंबर २०२२ मध्ये वराडकर पुन्हा आयर्लंडचे पंतप्रधान होणार आहेत. वराडकर २०१७ सालापपासून ते फेब्रुवारीतील निवडणुकीपर्यंत पंतप्रधान पदावर विराजमान होते. कोरोना संकटामुळे सरकार स्थापन होण्याचा तिढा सुटत नव्हता. यामुळे सत्तासमीकरणात सूत्र ठरवण्यात आले होते.

अशा प्रकारे भारतीय वंशाच्या आतापर्यंत दोन व्यक्तिंची पंतप्रधानपदी निवड झाली आहे. सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाली. तर पुढील महिन्यात डिसेंबर २०२२ मध्ये आयर्लंडच्या उपपंतप्रधानपदी असलेले, वराडकर पुन्हा एकदा पंतप्रधान होतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT