Robert Vadra, Robert Vadra addresses the media, hinting at a possible entry into active politics and aligning with the Congress party’s future strategy, Rahul Gandhi, Priyanka Gandhi Sarkarnama
देश

Robert Vadra Politics : आता रॉबर्ट वाड्राही राजकारणात एन्ट्री करणार? ; जाणून घ्या, काय केलंय सूचक विधान?

Robert Vadra Signals Political Entry : ''प्रियंकाला सर्वात आधी मीच म्हणालो होतो की, मी तुला...'' असंही रॉबर्ट वाड्रा यांनी सांगितलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Robert Vadra latest news : काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती रॉबर्ट वाड्रा आता राजकारणात एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याचं समोर येत आहे. विशेष म्हणजे याबाबत खुद्द त्यांनी स्वत:च तसे संकेतही दिल्याचे दिसत आहे.

त्यांचे म्हणणे आहे की, जर काँग्रेस पक्षाला वाटत असेल तर कुटुंबाचा आशीर्वाद घेऊन ते राजकारणात येऊ शकतात. मात्र त्याच्या या वक्तव्यावर काँग्रेस पक्षाकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

रॉबर्ट वाड्रांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी, राजकाराणात पदार्पण करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यांचे म्हणणे आहे की, गांधी परिवाराशी संबंधित असल्याने त्यांचा राजकारणाशी जुना संबंध आहे. त्यांनी सांगितले की, मागील काही वर्षांत अनेक राजकीय पक्षांनी त्यांना राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला. विशेषकरून निवडणुकीच्या काळात त्यांच्या नावाचा वापर केला गेला. परंतु त्यानंतरही त्यांनी नेहमीच राजकारणापासून कायम अंतर राखले.

रॉबर्ट वाड्रा म्हणाले की, मी गांधी परिवाराचा सदस्य आहे आणि हेच माझे राजकारणाशी संबंधामागचे एकमेव कारण आहे. मागील काही वर्षांत अनेक राजकीय पक्षांनी माझे नाव घेऊन, राजकीय खेळी खेळण्याचा प्रयत्न केले आहेत. जिथे कुठे निवडणूक होते, तिथे माझे नाव आपोआप येते. मी माझा परिवार विशेष करून प्रियंका गांधी आणि राहुल गांधींकडून राजकारणाचे गुण शिकलो आहे, कारण ते नेहमीच राजकारणात सक्रीय राहतात.

प्रियंका गांधींचा उल्लेख करत म्हटले की, प्रियंकाला सर्वात आधी मीच म्हणालो होतो की, मी तुला देशाच्या संसदेत पाहू इच्छितो. ती त्या ठिकाणी पोहचली आहे. ती अतिशय कष्टाळू आहे, मी केवळ प्रियंकाकडूनच नाही तर राहुल गांधींकडूनही राजकारणाबाबत बरच काही शिकलो आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT