Rohit Sharma, Shama Mohammad Sarkarnama
देश

Rohit Sharma Fat : रोहित शर्मा जाड, सर्वात निराशाजनक कॅप्टन! काँग्रेस प्रवक्त्या झाल्या क्लीन बोल्ड...

Congress Politics Shama Mohammad Champions trophy : काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितच्या शरीरावर टिप्पणी केली होती. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिलेला मजकूर हटवला आहे.

Rajanand More

New Delhi News : भारतीय क्रिकेट संघाने रविवारी कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्य फेरी गाठली. भारताने रविवारी न्यूझीलंडला धूळ चारत विजय मिळवला. या विजयानंतर काँग्रेस प्रवक्त्यांनी रोहितविषयी केलेली टिप्पणी वादात सापडली आहे. त्यावरून राजकारण तापले असून काँग्रेस पक्षाने रोहितविषयीच्या विधानावरून हात झटकत संबंधित प्रवक्त्यांना तंबी दिली आहे.

काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी रोहितच्या शरीरावर टिप्पणी केली होती. वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी एक्सवर लिहिलेला मजकूर हटवला आहे. शमा यांनी रोहित हा जाड खेळाडू असल्याचे म्हटले होते. तसेच भारताचा आतापर्यंतचा सर्वात निराशाजनक कॅप्टन असल्याचे विधानही त्यांनी केले होते. त्त्याला वजन कमी करण्याची गरज असल्याचा सल्लाही त्यांनी दिला होता.

शमा यांच्या या टिप्पणीनंतर मोठा वाद निर्माण झाला. भाजपने या विधानाच निषेध केला आहे. भाजपच्या नेत्या राधिका खेरा म्हणाल्या, ‘त्यांनी टी-20 विश्वचषक जिंकून देणाऱ्या संघाच्या कॅप्टनचा अपमान केला आहे. त्यांच्या शारीरिक व्यंगावर भाष्य केले आहे. रोहितने देशाला विश्वचषक जिंकून दिला, पण काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाला विजयी करू शकले नाहीत.’

वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसनेही हात झटकले. पक्षाचे नेते पवन खेडा यांनी म्हटले की, शमा मोहम्मद यांनी क्रिकेटच्या दिग्गज खेळाडूविषयी केलेली टिप्पणी पक्षाची अधिकृत भूमिका नाही. संबंधित पोस्ट हटवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत. भविष्यात सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. काँग्रेसकडून खेळाडूंच्या योगदानाचा सन्मान केला जातो. त्यांना कमी लेखण्याच्या कोणत्याही विधानाचे पक्ष समर्थन करत नाही.

टीका झाल्यानंतर शमा यांनी आपली पोस्ट डिलिट केली. तसेच याबाबत खुलासा करताना म्हटले आहे की, मी खेळाडूच्या फिटनेसविषयी ट्विट केले होते. त्यामध्ये शारिरीक व्यंगावर बोलण्याचा हेतू नव्हता. खेळाडूला फिट असायला हवे, असे मला वाटते. त्याचे वजन थोडे जास्त आहे, असे मला वाटले. म्हणून त्याविषयी मी ट्विट केले. पण त्यावरून विनाकारण वाद निर्माण करण्यात आला.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT