Rahul Gandhi News : शशी थरूरांच्या नाराजीची चर्चा अन् राहुल गांधींनी शेअर केला खास फोटो! द्यायचा तो संदेश दिला...

Shashi Tharoor Congress Politics : काँग्रेसचे खासदार शशी थरूर हे मागील काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे.
Kerala Congress Leaders
Kerala Congress LeadersSarkarnama
Published on
Updated on

Kerala Politics : काँग्रेसचे केरळमधील खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या नावाची सध्या देशाच्या राजकीय वर्तूळात जोरदार चर्चा होत आहे. पक्षावर ते नाराज असल्याचे त्यांच्या काही विधानांवरून स्पष्ट झाले होते. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांनी पक्षातील नेत्यांची नाराजीही ओढवून घेतली होती.

शशी थरूर यांच्या नाराजीची चर्चा असतानाच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी सोशल मीडियात एक खास फोटो शेअर केला आहे. थरूर यांच्या नाराजीप्रमाणे केरळ काँग्रेसमधील इतर नेत्यांच्या नाराजीवरही त्यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच थरूर आणि विरोधी पक्षांनाही द्यायचा तो संदेश दिला आहे.

Kerala Congress Leaders
Mayawati News : मायावतींकडून भाच्याला मोठा झटका, आता भावासाठी पायघड्या!

राहुल यांनी 28 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीनंतर केरळ काँग्रेसमधील नेत्यांचा पत्रकार परिषदेतील एक फोटो राहुल यांनी सोशल मीडियात शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी पक्षातील सर्व नेते केरळमध्ये एकजुट आणि आणि मिळून काम करत असल्याचे लिहिले आहे.

राहुल गांधींनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये शशी थरूरही आहेत. त्यांच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी पक्षातील नेते एकजुट असल्याचा संदेश इतर पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विरोधकांना देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील काही महिन्यांत केरळमध्ये विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्याकडून पक्षातील सर्वकाह आलबेल असल्याचा सूचक संदेश देण्यात आला आहे.

Kerala Congress Leaders
BJP Minister : लोकांना सरकारकडे भीक मागण्याची सवय लागलीय! भाजपच्या मंत्र्यांचे बेताल वक्तव्य

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत केरळमधील विधानसभा निवडणुकीच्या रणनीतावरही चर्चा झाली. जे नेते पक्षाच्या धोरणाविरोधात बोलतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही नेत्यांना देण्यात आला आहे. थरूर यांच्या उपस्थितीत झालेली ही बैठक तीन तास चालली होती.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com