Goa nightclub owners flee to Thailand after fatal fire Sarkarnama
देश

Goa Nightclub Fire: गोवा नाइट क्लब अग्निकांड; 25 जणांचा बळी, लुथरा बंधूंचा थायलंडला पळ!

Goa Nightclub Fire Owners Saurabh Gaurav Luthra Fled to Thailand: गोवा नाइट क्लब अग्निकांडानंतर बर्च बाय रोमिओ लेन नाइट क्लबचे मालक लुथरा बंधू पसार झाल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे.

Pradeep Pendhare

Romeo Lane Nightclub Fire: हडफडे इथल्या ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीत 25 जणांचा बळी गेल्यानंतर क्लबचा मालक सौरभ लुथरा आणि त्याचा भाऊ गौरव लुथरा हे दोघेही फुकेटला (थायलंड) पळून गेल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांना लुथरा बंधूंना पकडण्यासाठी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी छापेमारी केली. परंतु तेथून ते हवाई मार्गाने पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लुथरा बंधूंच्या दिल्लीतील निवासस्थानावर कायदेशीर नोटिस चिटकवली आहे. गोवा (Goa) पोलिसांनी दोघांविरुद्ध लूक-आउट नोटीस जारी केली आहे.

लुथरा बंधूंना पकडण्यासाठी दिल्लीतील (Delhi) त्यांच्या निवासस्थानावर छापा टाकण्यात आला; पण त्यांनी आधीच पोबारा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी दिल्लीतून क्लब कर्मचारी भरत कोहली या पाचव्या संशयिताला अटक केली. दुसरीकडे, राज्य सरकारने न्यायिक चौकशीसाठी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.

न्यायिक समिती आज अग्निकांडातील क्लबची भेट पाहणी करणार आहे. समितीला कोणत्याही खात्याकडून संबंधित दस्तावेज मागवण्याचे व चौकशीसाठी कोणालाही बोलावण्याचे अधिकार दिले गेले आहेत. दरम्यान, आगीत भाजलेल्या पाचही रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाला आज रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. उर्वरितांना पुढील सात दिवसांत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता डॉक्टरांकडून वर्तवण्यात आली आहे.

लुथरा बंधूंचा विमान प्रवास

यात गोव्याबाहेरील दोन कामगार आणि दोन पर्यटकांचा समावेश आहे.दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर 16 मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, दिल्लीत गेल्यावर गोवा पोलिसांना समजले, की लुथरा बंधू रविवारी सात डिसेंबरला पहाटे साडेपाच वाजता दुर्घटनेनंतर 6-ई 1073या विमानाने फुकेटला गेले.

लुथरा बंधू नियोजनपूर्वक पसार

लुथरा बंधू पसार होण्यावरून कळते की, त्यांनी पोलिस कारवाईपासून वाचण्यासाठी नियोजनपूर्वक पळ काढला. एफआयआर दाखल झाल्यानंतर लगेचच गोवा पोलिसांचे एक पथक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी आरोपींच्या लपण्याच्या ठिकाणांवर छापे टाकले, परंतु ते सापडले नाहीत. कायद्यानुसार त्यांच्या निवासस्थानाला नोटीस चिकटवण्यात आली आहे.

क्लबकडे अग्निशमन एनओसी नव्हता

गोव्यात नाईट क्लबला (Goa Night Club) लागलेल्या आगीत 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर, राज्य सरकारने रोमियो लेन कंपनीवर कारवाई तीव्र केली आहे. अधिकाऱ्यांनी कंपनीच्या मालकीच्या इतर दोन मालमत्ता देखील सील केल्या आहेत.

क्लबमध्ये इलेक्ट्रिक फटाके वाजवल्यामुळे आग लागली असावी. क्लबकडे अग्निशमन एनओसी देखील नव्हता. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरक्षेचे उल्लंघन करण्यास परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT