Narendra Modi Mohan Bhagwat sarkarnama
देश

Mohan Bhagwat : देश चालवण्यात भाजप संघापेक्षा तज्ज्ञ; मतभेदाचे काही विचार असतात पण..., मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Mohan Bhagwat on RSS–BJP Relations : "भाजपसोबत मतभेदाचे कोणतेही मुद्दे नाहीत. मतभेदाचे काही विचार असू शकतात. परंतु मनभेद अजिबात नाही. केंद्र आणि राज्यांतील सरकारांशी संघाचा चांगला समन्वय आहे.

Jagdish Patil

RSS Chief Mohan Bhagwat on BJP : "भाजपसोबत मतभेद नाहीत. मतभेदाचे काही विचार असू शकतात, मात्र मनभेद अजिबात नाहीत," असं म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाचा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारशी कोणताही वाद नसल्याचं स्पष्ट केलं.

नवी दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेच्या समारोप कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आरएसएस आणि भाजपमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

याच चर्चांशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना मोहन भागवत म्हणाले, "भाजपसोबत मतभेदाचे कोणतेही मुद्दे नाहीत. मतभेदाचे काही विचार असू शकतात. परंतु मनभेद अजिबात नाही. केंद्र आणि राज्यांतील सरकारांशी संघाचा चांगला समन्वय आहे. शिवाय तो केवळ वर्तमान सरकारशीच नव्हे तर प्रत्येक सरकारांशी संघाचा चांगला समन्वय असतो.

संघाचा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारशी कोणताही वाद नसल्याचं सांगत भागवत यांनी भाजपचे निर्णय संघ घेत नसल्याचे स्पष्ट केलं. शिवाय संघाची भूमिका केवळ सल्लागाराची असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

ते म्हणाले, "भाजपला संघाकडून केवळ सल्ला दिला जातो. मात्र, त्यांच्या निर्णय प्रक्रियेत कधीही हस्तक्षेप केला जात नाही. आपण 50 वर्षांपासून शाखा चालवीत आहोत. कोणी आपल्याला सल्ला किंवा सूचना दिल्या तर त्या ऐकू शकतो परंतु पक्ष म्हणून भाजप देश चालवतो आणि त्यामध्ये ते संघापेक्षा तज्ज्ञ आहेत."

दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना त्यांनी भविष्यात कुटुंब व्यवस्था टिकून राहण्यासाठी आणि राष्ट्र संरक्षणासाठी प्रत्येक दांपत्याने तीन मुलांना जन्म द्यायला हवा, धर्मांतरामुळे लोकसंख्येतील असमतोल वाढत चालला आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT