Mohan Bhagwat Sarkarnama
देश

Mohan Bhagwat Appeals : 'कोणत्याही षडयंत्राला यशस्वी होऊ देऊ नका…', भारत-पाकिस्तान तणावावर RSS प्रमुख मोहन भागवत काय म्हणाले?

Mohan Bhagwat India Pakistan War : राष्ट्रीय संकटात संपूर्ण देश तन-मन-धनाने देशाचे सरकार व सैन्य बळाच्या पाठीशी उभा आहे,असे आरएसएसच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Rajesh Charpe

Mohan Bhagwat News : पहेलगावमध्ये भारतीय पर्यटकांवर गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानच्या प्रायोजित अतिरेक्यांना उद्ध्वस्त ध् करण्यासाठी भारतीय सैन्याने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर'चे स्वागत करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच आता राष्ट्रविरोधी शक्ती, सामाजिक एकता आणि समरसता भंग करण्याचा धोका व्यक्त केला आहे, त्यामुळे कुठल्याही षडयंत्राला भारतीयांनी बळी पडू नये, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर'करिता भारत सरकार व सैन्यबळांचे हार्दिक अभिनंदन. हिंदू पर्यटकांची नृशंस हत्या करणाऱ्या पीडित कुटुंबीय व संपूर्ण देशाला न्याय देणयासाठी केलेल्या कारवाईने संपूर्ण देशाच स्वाभिमान आणि हिंमत वाढला असल्याचे संघाच्यावतीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पाकिस्तानातील अतिरेकी व त्यांच्या गडावर भारतीय सैन्याने डागलेले क्षेपणास्त्रे ही भारताच्या सुरक्षेसाठी आवश्यक व अपरिहार्य होती असे देखील निवेदनात म्हटले आहे.

राष्ट्रीय संकटात संपूर्ण देश तन-मन-धनाने देशाचे सरकार व सैन्य बळाच्या पाठीशी उभा आहे. पाकिस्तानी सेनेद्वारा भारताच्या सीमावर्ती भागातील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्यांवर केले जात असलेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जे या हल्ल्याचे शिकार झाले त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. अशा आव्हानात्मक परिस्थितीत शासन आणि प्रशासनाच्यावतीने जारी होणाऱ्या सूचनांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहनही संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

सावधगिरीचा इशारा

राष्ट्रविरोधी शक्ती सामाजिक एकता व समरसता भंग करण्याचा धोका आहे. त्यांच्या षडयंत्राला यशस्वी होऊ देऊ नका. आपल्या देशभक्तीचा परिचय देऊन सेना व नागरी प्रशासनला आवश्यक असलेली सेवा देण्यास तत्पर राहावे, सहकार्य करावे तसेच राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा कायम ठेवावी असेही आवाहन संघाच्यावतीने करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT