Mohan Bhagwat Sarkarnama
देश

Mohan Bhagwat : RSS च्या नोंदणीवरून पुन्हा फुटले नव्या वादाला तोंड; खरगेंच्या पत्रावर भागवत म्हणाले, "हिंदू धर्माचीही नोंदणी नाही..."

RSS Karnataka Controversy : "संघाची स्थापना ब्रिटिशकाळात झाली. मूळ हिंदू धर्माचीही कुठे नोंदणी झालेली नाही; जगातील अशा अनेक गोष्टींची नोंदणी झालेली नाही. तर ज्यांना सरकारकडून निधी हवा असतो, त्यांना नोंदणीची आवश्यकता असते. परंतु, सरकारला आरएसएसचे अस्तित्व पूर्णपणे माहीत आहे. सरकारने आतापर्यंत संघावर दोन वेळा बंदी घातली होती."

Jagdish Patil

RSS Karnataka Controversy : कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संदर्भात नव्या वादाला तोंड फुटले आहे. कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी पत्राद्वारे मोहन भागवत यांना कर्नाटकमधील आरएसएसच्या कायदेशीर दर्जाबाबत प्रश्न विचारले आहेत. आरएसएसची नोंदणी करण्यात आली आहे की नाही, तसेच संघटनेच्या निधीचे स्रोत कोणते? असे अनेक प्रश्न खरगे यांनी उपस्थित केले आहेत.

खरगेंच्या पत्रामुळे कर्नाटकातील राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना आणि वादाला तोंड फुटले आहे. प्रियांक खर्गे यांनी आपल्या पत्रात विचारले आहे की, संघाची कर्नाटकमधील कायदेशीर स्थिती नेमकी काय आहे? संघाने कोणत्याही कायद्याअंतर्गत नोंदणी केली आहे का? जर नसेल, तर तो कोणत्या कायदेशीर चौकटीत काम करतो?

याशिवाय संघाच्या निधीचे स्रोत कोणते आहेत, आर्थिक व्यवहारांची माहिती सार्वजनिक केली जाते का, तसेच संघाची मालमत्ता, कर भरणा आणि संघटनेच्या उत्तरदायित्वासंबंधी इतर अनेक प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. तर खरगे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर भाष्य करताना मोहन भागवत म्हणाले, "मला यावर उत्तर द्यायचे नाही.

संघाचे कार्य अत्यंत खुल्या पद्धतीने चालते. हे केवळ राजकारण सुरू असून, आम्हाला आता अशा गोष्टींची सवय झाली असून संघाची स्थापना झाल्यानंतर लगेचच १० ते १५ वर्षांतच त्याच्या नोंदणीबाबतच्या मागण्या आणि वाद सुरू झाले होते. तर भागवतांनी संघाच्या नोंदणी संदर्भात वक्तव्य करताना "मूळ हिंदू धर्माचीही कुठे नोंदणी झालेली नाही", असं वक्तव्य केलं आहे.

त्यांचं हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भागवत म्हणाले, "संघाची स्थापना ब्रिटिशकाळात झाली. मूळ हिंदू धर्माचीही कुठे नोंदणी झालेली नाही; जगातील अशा अनेक गोष्टींची नोंदणी झालेली नाही. तर ज्यांना सरकारकडून निधी हवा असतो, त्यांना नोंदणीची आवश्यकता असते. परंतु, सरकारला आरएसएसचे अस्तित्व पूर्णपणे माहीत आहे. सरकारने आतापर्यंत संघावर दोन वेळा बंदी घातली होती.

एकदा कोर्टाच्या आदेशाने आणि दुसऱ्यांदा स्वयंसेवकांनी सत्याग्रह केल्याने संघावरील बंदी उठवण्यात आली. त्यामुळे अशा राजकीय गोष्टी घडत असतात, असंही भागवत यांनी म्हटलं आहे. शिवाय मागील १०० वर्षांत आम्हाला कोणीही असे सांगितले नाही की आम्ही नोंदणी केलीच पाहिजे.

त्यामुळे मी आता यावर उत्तर का देऊ? हे सगळं केवळ राजकारण असून या पत्राला गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही. अशातून केवळ लोकांच्या मनात संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, पण लोकांना आम्ही कोण आहोत आणि काय काम करतो हे चांगलेच माहीत आहे, असंही भागवत यावेळी म्हणाले.

प्रियांक खर्गे नेमकं काय म्हणाले?

प्रियांक खर्गे म्हणाले, कोणतीही संघटना कितीही जुनी किंवा मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी असू शकत नाही. त्यांनी आकडेवारीचा दाखला देत सांगितले की, सध्या कर्नाटकमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४,१२७ दैनंदिन शाखा, तर १,३८९ साप्ताहिक बैठका आणि ६० मासिक मंडळ्याही कार्यरत आहेत.

कर्नाटकमध्ये RSS च्या हालचाली आणि उपक्रम इतक्या व्यापक प्रमाणावर सुरू असताना, या संघटनेला कायद्याच्या आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाच्या चौकटीबाहेर ठेवता येणार नाही. त्यामुळे संघाच्या कामकाजात पारदर्शकता असणे आवश्यक असून, त्याची कायदेशीर स्थिती, आर्थिक स्रोत आणि उत्तरदायित्व याबाबत स्पष्ट माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध व्हावी, अशी मागणी खरगे यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT