Pune Transfer Scam : पुण्यात 'आजार' दाखवून बदली रोखण्याचा प्रयत्न; जिल्हाधिकाऱ्यांच्या एका घोषणेनं 60 कर्मचारी झटक्यात झाले बरे...

Pune collector action on Transfer Scam : महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात सुरू झाली. या प्रक्रियेदरम्यान महसूल विभागातील सुमारे १२५ कर्मचाऱ्यांनी बदली टाळण्यासाठी किंवा शेजारच्या तालुक्यात बदली नको म्हणून विविध कारणांची जंत्रीच सादर केली होती.
Pune District Collector Jitendra Dudi
Pune District Collector Jitendra Dudi reviews the revenue department transfer process as employees citing medical reasons face scrutiny by a special medical committee.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 16 Jun : बदली टाळण्यासाठी किंवा मनासारखी सोयीची जागा मिळवण्यासाठी 'आजारी' पडण्याचे सोंग घेणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांना पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी चांगलाच दणका दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कथित आजारी कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी थेट डॉक्टरांची 'विशेष समिती' नेमण्याचा कडक पवित्रा घेताच, वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या तब्बल ६० कर्मचाऱ्यांचे 'आजार' अवघ्या काही क्षणात गायब झाले आहेत.

आपली लबाडी पकडली जाणार आणि भांडाफोड होणार या भीतीने या ६० जणांनी आपले वैद्यकीय कारणांचे अर्ज तातडीने मागे घेत गुपचूप बदली स्वीकारली आहे. महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिनियम २००५ नुसार जिल्ह्यातील २८५ महसूल कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात सुरू झाली.

या प्रक्रियेदरम्यान महसूल विभागातील सुमारे १२५ कर्मचाऱ्यांनी बदली टाळण्यासाठी किंवा शेजारच्या तालुक्यात बदली नको म्हणून विविध कारणांची जंत्रीच सादर केली होती. यामध्ये 'स्वतःची तब्येत बरी नाही', 'गंभीर आजार आहे', 'घरातील व्यक्ती आजारी आहेत' अशी रडगाणी गात सोयीच्या जागी नियुक्ती देण्याची मागणी केली होती.

Pune District Collector Jitendra Dudi
Trump Iran Peace Deal : ट्रम्प यांनी इराणसह जगाचं टेन्शन पुन्हा वाढवलं! शांतता करारातील 'ती' बातमी खोटी असल्याचं केलं स्पष्ट

यावर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी एक मोठा प्रशासकीय डाव टाकला. त्यांनी या अर्जांची सत्यता तपासण्यासाठी डॉक्टर्स आणि उपजिल्हाधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक विशेष वैद्यकीय तपासणी समिती स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. प्रशासनाचा हा कडक पवित्रा आणि तपासणी समितीचा सांगावा मिळताच, बदलीपात्र कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. समितीसमोर गेले की आपले बिंग फुटणार हे लक्षात येताच ६० कर्मचाऱ्यांनी तातडीने आपले वैद्यकीय अर्ज मागे घेतले.

Pune District Collector Jitendra Dudi
RTI activist controversy : आरटीआय कार्यकर्ते सरकारी कर्मचाऱ्यांना काम करू देईना, धंदा करून ठेवलाय; सर्वोच्च न्यायालयाची गंभीर टिप्पणी

याशिवाय, आजारपणाचे कारण पुढे करून बदलीचे अर्ज दाखल केलेल्या इतर सुमारे ४० कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी अकार्यकारी पदावर नियुक्ती करून मोठा झटका दिला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून समुपदेशन करून ही संपूर्ण बदली प्रक्रिया राबवण्यात आली.

या कारवाईमुळे वर्षानुवर्षे मुख्य कार्यालयात आणि मुख्य शहरात ठाण मांडून बसलेल्या 'वजनदार' कर्मचाऱ्यांची थेट ग्रामीण भागात रवानगी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात अत्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुणे आणि हवेली तालुक्यांत पदस्थापना देऊन खऱ्या अर्थाने न्याय देण्यात आला असल्याचे बोले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com