Russian drone strikes target Ukraine for the second night in a row, intensifying the ongoing war and increasing global tensions.  Sarkarnama
देश

Russia Vs Ukraine : पुतिन यांनी यूक्रेनची झोप उडवली! सलग दुसरी रात्र ठरली वैराची...

Ongoing Escalation in the Russia-Ukraine Conflict : रशियाने सोमवारी रात्री तब्बल 500 हून अधिक ड्रोन आणि जवळपास 30 क्षेपणास्त्र डागत यूक्रेनची झोप उडवली होती.

Rajanand More

Russia-Ukraine War : यूक्रेनने एअरबेसवर केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी रशियाकडून सलग दुसऱ्या रात्री यूक्रेनवर तुफान हल्ला करण्यात आला. रशियाच्या लष्कराने प्रामुख्याने कीव शहराला टार्गेट केले होते. या हल्ल्यात अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

रशियाने सोमवारी रात्री तब्बल 500 हून अधिक ड्रोन आणि जवळपास 30 क्षेपणास्त्र डागत यूक्रेनची झोप उडवली होती. मागील तीन वर्षांतील हा सर्वात मोठा हल्ला होता, असे सांगितले जात आहे. त्यानंतर रशियाकडून सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्रीही यूक्रेनवरील हल्ला सुरूच ठेवला.

रशियाकडून कीव शहरावर रात्रभर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे तर चार जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचप्रमाणे जवळपास सात जिल्ह्यांनाही टार्गेट करण्यात आले होते. रॉयटर्सच्या वृत्तानुसार शहरांत अनेक ठिकाणी मोठ्या स्फोटांचे आवाज रात्रभर येत होते.

दरम्यान, यूक्रेनच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने देशभरात सुमारे 315 डोन डागले. त्यापैकी 277 ड्रोन हवेतच नष्ट करण्यात आले. रशियाने सात मिसाईलही डागली होती. पण युक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांना हवेतच नेस्तनाबूत केल्याचा दावाही यूक्रेन लष्कराने केला आहे.  

एअर डिफेन्स सिस्टीम

रशियाच्या ड्रोन हल्ले परतवण्यात एअर डिफेन्स सिस्टीमची महत्वाची भूमिका राहिली आहे, असे यूक्रेनच्या दाव्यांवरून स्पष्ट होते. मात्र, प्रत्यक्षात अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात रशियाला यश आल्याचेही दिसते. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षामध्ये पाकिस्तानकडूनही शेकडो ड्रोन आणि मिसाईल डागण्यात आले होते. पण सर्व हल्ले भारताने एअर डिफेन्स सिस्टीमद्वारे परतवून लावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT