India Vs China : भारतीय नौदल अन् मुंबई कोस्ट गार्डवर चीन खूष; काय घडलं अरबी समुद्रात?

Indian Navy and Coast Guard Lead Rescue Operation in Arabian Sea : केरळमधील कोची येथील अरबी समुद्रात सोमवारी सिंगापूरच्या मालवाहू जहाजामध्ये स्फोट झाला होता.
India China Relation
India China RelationSarkarnama
Published on
Updated on

China Thanks India for Swift Maritime Response : पाकिस्तानचे समर्थन करण्यासाठी सतत पुढे असलेल्या चीनने भारतीय नौदल आणि कोस्ट गार्डच्या एका कामगिरीचे कौतुक केले आहे. एवढेच नाही तर चीनने उघडपणे आभारही मानले आहेत. अरबी समुद्रात एका मालवाहू जहाजाला आग लागल्यानंतर जे घडलं... ते संपूर्ण जगानं पाहिले. त्यावर चीनने सकारात्मक भूमिका घेत भारताच्या कृतीचे आठवण ठेवली.

नेमकं काय घडलं?

केरळमधील कोची येथील अरबी समुद्रात सोमवारी सिंगापूरच्या मालवाहू जहाजामध्ये स्फोट झाला होता. या स्फोटानंतर मोठी आगही लागली होती. त्यानंतर भारतीय नौदल आणि कोस्टगार्ड म्हणजेच तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. त्यावेळी जहाजावर 22 जण होते. त्यापैकी 18 जणांना वाचविण्यात यश आले. त्यामध्ये 14 जण चीनचे नागरिक होते.

या घटनेनंतर भारतातील चीनच्या राजदूत यू जिंग यांनी भारताचे आभार मानले. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून म्हटले आहे की, 9 जूनला एमव्ही वान हई 503 जहाजाला आग लागली होती. ही आग केरळमधील अजिक्कलपासून 44 नॉटिकल मिल लांब लागली होती. जहाजावर 22 लोक होते. त्यापैकी 14 चीनचे आणि ६ तैवानचे नागरिक होते. भारतीय नौदल आणि मुंबई तटरक्षक दलाने तातडीने केलेल्या कार्यवाहीबद्दल आण्ही मनापासून आभार मानतो, असे जिंग यांनी म्हटले आहे.

India China Relation
'या' तरुणीचे शरद पवारांसमोर खणखणीत भाषण...

दरम्यान, भारतीय तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, हे जहाज 7 जूनला 22 कर्मचाऱ्यांसह कोलंबो पोर्टहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. ते 10 जूनला मुंबईत पोहचणार होते. स्फोटाची माहिती मिळाल्याने तटरक्षक दलाने तातडीने बचावकार्य सुरू केले. मात्र, तोपर्यंत आग वाढत चालली होती. त्यावेळी 18 जण जहाजातून बाहेर पडले होते.   

India China Relation
Election Commission on Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचाही पलटवार; काँग्रेसला विचारला 'तो' गंभीर प्रश्न!

जहाजावर असलेल्या अनेक कंटेनरमध्ये डिझेल आणि इतर इंधन होते. त्यामुळे आता समुद्रात मोठ्या प्रमाणात प्रदुषण झाले असून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तटरक्षक दलाकडून त्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हे कंटेनर समुद्रात पसरले असून तटरक्षक दलाकडून त्याचा शोध घेतला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com