Cabinet Decisions : SC आयोगाला वैधानिक दर्जा, विद्यावेतनात वाढ..! फडणवीस सरकारचे धडाकेबाज निर्णय

Maharashtra Cabinet’s Welfare Decisions : मंत्रिमंडळातील निर्णयांनुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत विधेयक आणण्यात येणार आहे.
Cabinet Meeting
Cabinet MeetingSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Cabinet : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सरकारने तीन मोठे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेली या बैठकीत अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा, उत्पादन शुल्कात वाढ आणि पदव्युत्तर पदवीतील विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंत्रिमंडळातील निर्णयांनुसार आगामी विधिमंडळ अधिवेशनात याबाबत विधेयक आणण्यात येणार आहे. राज्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी दोन स्वतंत्र आयोग स्थापन करण्यात आले आहेत. आजच्या बैठकीत अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा देण्याच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या विधेयकाच्या प्रारूपास मान्यता देण्यात आली. तसेच या आयोगाकरिता निर्माण केलेल्या 27 पदांना आयोगाच्या आस्थापनेवर हस्तांतरित करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

विद्यावेतनात वाढ

राज्यातील शासकीय भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व्यवसायोपचार (ऑक्युपेशनल थेरपी) पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा आणि बी.एस्सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Cabinet Meeting
'या' तरुणीचे शरद पवारांसमोर खणखणीत भाषण...

शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना आंतरवासिता प्रशिक्षण काळात दरमहा 1 हजार 750 रुपये विद्यावेतन मिळत होते. यामध्ये ६ हजार २५० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. तर याच अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना आता 33 हजार 730 रूपये इतके विद्यावेतन मिळणार असून ही वाढ 1 जूनपासूनच लागू होणार आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड येथील शासकीय परिचर्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आंतरवासिता कालावधी सहा महिन्यांचा असतो. या विद्यार्थ्यांना पहिल्यांदाच दरमहा 8 हजार रूपये विद्यावेतन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Cabinet Meeting
India Vs China : भारतीय नौदल अन् मुंबई कोस्ट गार्डवर चीन खूष; काय घडलं अरबी समुद्रात?

उत्पादन शुल्कात वाढ

उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात वाढीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार उत्पादन शुल्कात वाढ करण्यात येणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या (IMFL) 260 रुपये प्रति बल्क लिटर पर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 3 पट वरुन 4.5 पट करण्यात येणार. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर 180 रुपये वरुन 205 रुपये करण्यात येणार आहे.

विदेशी मद्याचा नवा प्रकार

महाराष्ट्र मेड लिकर (MML) हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास  मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक, असे उत्पादन करु शकतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com