TMC latest controversy : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसचे अनेक नेते अडचणीत आले आहे. त्यामध्ये पक्षाचे प्रमुख नेते व माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्याही अडचणींमध्ये भर पडली आहे. बंगाल भाजपने ४३ मालमत्तांची यादी जाहीर करत त्या अभिषेक यांच्या असल्याचा दावा केला आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीतील एका प्रॉपर्टी अभिषेक बॅनर्जी आणि सयोनी घोष या महिलेच्या नावावर असल्याचे दिसते. हे नाव समोर येताच अनेकांनी या महिला म्हणजे तृणमूलच्या खासदार सायोनी घोष असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तृणमूलने भाजपचा दावा खोडून काढत ही यादी बनावट असल्याचे म्हटले आहे.
अभिषेक बॅनर्जी आणि सयोनी घोष या नावावर असलेल्या मालमत्तेचा पत्ता भाजपने जाहीर केलेल्या यादीमध्ये १९डी, सेव्हन टँक्स लेन, कोलकाता असा देण्यात आला आहे. त्यावरून आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. खासदार घोष यांनी बंगालच्या निवडणुकीच्या प्रचारात भाजपविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. त्यांची अनेक भाषणे व्हायरल झाली होती. त्यांच्या भाषणाची स्टाईल चर्चेत आली होती.
खासदार घोष यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबतच्या संपत्तीचा दावा खोडून काढला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अभिषेक बॅनर्जी आणि सयानी घोष यांनी संयुक्तपणे मालमत्ता घेतली आहे, असे काही फॉरवर्ड्स मी पाहिले. ती ‘सयानी घोष’ मी नाही. आजपर्यंत मी राजकारणातून कोणताही आर्थिक फायदा मिळवलेला नाही.
माझी सर्व मालमत्ता निवडणूक प्रतिज्ञापत्रात जाहीर केलेली आहे. त्याबाबतच्या अधिकृत नोंदी तपासा. कोणतेही पुरावे नसताना माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करणे थांबवा. मी एक इंचही मागे हटणार नाही आणि हे प्रकरणही दुर्लक्षित करणार नाही. खोटी माहिती पसरवणाऱ्यां विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. ही 'घोष' कुणाच्याही दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा सायोनी घोष यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.