Rahul Gandhi vs PM modi : आर्थिक वादळ डोक्यावर अन् पंतप्रधान इटलीत जाऊन..! 'मेलोडी'वरून राजकारण तापलं, राहुल गांधींचा जोरदार प्रहार

Melody toffee controversy, Modi Meloni viral video : PM मेलोनी यांनी शेअर केलेला व्हिडिओ काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे.
Rahul Gandhi attack on PM Modi
Rahul Gandhi attack on PM ModiSarkarnama
Published on
Updated on

PM Modi Italy visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्डिया मेलोनी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. PM मोदी हे मेलोनी यांना मेलोडी टॉफीचे पॅकेट देतानाचा हा व्हिडिओ आहे. मेलोनी यांनी आपल्याला मोदींनी हे गिफ्ट दिल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओवरून आता राजकारण तापले आहे.

पंतप्रधान मेलोनी यांनीच सोशल मीडियात हा व्हिडिओ केला आहे. त्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार प्रहार केला आहे. त्यांनी 'एक्स'वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आर्थिक वादळ डोक्यावर आहे आणि आमचे पंतप्रधान इटलीत टॉफी वाटत आहेत.

शेतकरी, युवक, महिला, मजूर आणि छोटे व्यापारी सगळे रडत आहेत. पंतप्रधान हसून रील बनवत आहे आणि भाजपवाले टाळ्या वाटत आहेत. हे नेतृत्व नाही, नौटंकी आहे, अशी जोरदार टीका राहुल गांधी यांनी मोदींवर केली. राहुल गांधी यांच्याप्रमाणे काँग्रेस व अन्य विरोधी पक्षातील नेत्यांकडून मोदींवर टीका करण्यात आली.

Rahul Gandhi attack on PM Modi
BJP vs NCP news : भाजपला 'दे धक्का', आमदाराच्या घरात फूट; भावाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

दरम्यान, मेलोनी यांनी शेअर केलेला व्हिडिओ काही मिनिटांतच तुफान व्हायरल झाला असून त्यावर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडत आहे. खास गिफ्ट घेतानाचा हा क्षण खुद्द मेलोनी यांनीच मोबाईलमध्ये टिपला आहे. या गिफ्टसाठी मेलोनी यांनी मोदींचे आभारही मानले आहेत.

Rahul Gandhi attack on PM Modi
Modi viral moment : PM मोदी अन् मेलोनी यांच्यातील 'मेलोडी' तुफान व्हायरल; खास गिफ्ट देतानाचा व्हिडिओ आला समोर...

मोदी-शहा गद्दार

राहुल गांधी यांनी आज रायबरेलीत काँग्रेस कायकर्त्यांना संबोधित करतानाही पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गद्दार म्हटले. आरएसएसचे कार्यकर्ते तुमच्या समोर आल्यानंतर ते पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याविषयी बोलतील. तेव्हा तुम्ही त्यांना तोंडावर सांगा की, पंतप्रधान, गृहमंत्री आणि संघटन (भाजप) गद्दार आहेत. तुम्ही आमच्या देशाला विकण्याचे काम केले आहे. संविधानावर हल्ला केलाय. आंबेडकरांवर हल्ला केला आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com