Sadhvi Pragya Singh Thakur Sarkarnama
देश

Sadhvi Pragya Singh Thakur :'जिवंत राहिले तर...'; साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा काँग्रेसवर गंभीर टॉर्चरचा आरोप!

Sadhvi Pragya Singh accuses Congress : मालेगाव स्फोट प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद अंतिम टप्प्यात सुरू असून, साध्वी प्रज्ञा सिंह यांना जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.

Mayur Ratnaparkhe

Sadhvi Pragya Singh Thakur and Malegaon blast case hearing : मालेगाव स्फोट प्रकरणातील माजी खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना वॉरंट जारी झाले आहे. एनआयए कोर्टाने त्यांना 13 नोव्हेंबर रोजी हजर होण्याचा आदेश दिला आहे. याआधीही साध्वी प्रज्ञा अनेकदा न्यायालयासमोर हजर झालेल्या नाहीत. न्यायालयाकडून वॉरंट मिळाल्यानंतर सोशल मीडियावर साध्वी प्रज्ञा यांनी आपला एक फोटो शेअर केला आहे, ज्यात त्यांच्या अंगावर सूज असल्याचे दिसून येत आहे.

न्यायालयाने म्हटले आहे की, त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. याचबरोबर एनआयए न्यायालयाने म्हटले की या केसमध्ये अंतिम टप्प्यातील युक्तिवाद सुरू आहे. अशावेळी प्रज्ञा ठाकूर(Sadhvi Pragya Singh Thakur) यांचे न्यायालयात हजर राहणे आवश्यक आहे. तर, दुसरीकडे प्रज्ञा ठाकूर यांनी आपल्या प्रकृती खालवल्याचे सांगत, सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी जर मी जिवंत राहिले तर नक्कीच न्यायालयात जाईन, असं म्हटलं आहे. याशिवाय काँग्रेसकडून कशाप्रकारे टॉर्चर केले गेलं हेही त्यांनी सांगितलं आहे.

मुंबईच्या स्पेशल NIA कोर्टात 2008च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अंतिम युक्तिवाद सुरू आहे. न्यायालयाचे म्हणणे आहे की या प्रकरणात साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी उपस्थित राहणे अतिशय आवश्यक आहे. मात्र प्रज्ञा ठाकूर न्यायालयात पोहचत नसल्याने विशेष न्यायाधीश एके लाहौती यांनी त्यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाने प्रज्ञा ठाकूर यांना 13 नोव्हेंबर रोजी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

खालावलेल्या प्रकृतीबाबत सांगितले -

या दरम्यान साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या खालावलेल्या प्रकृतीबाबत सांगितले. त्यांनी म्हटले की, काँग्रेसचं टॉर्चर केवळ एटीएस कस्टडी पर्यंत नाही. माझ्या आयुष्यभरासाठीची जीवघेणा त्रास बनले आहे. मेंदूवर सूज, कमी दिसणे, कमी ऐकू येणे, बोलण्यात अडखळणे, स्टेरॉइड आणि न्यूरोच्या औषधांमुळे संपूर्ण शरीरावर सूज. एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत, जिवंत राहिले तर कोर्टात नक्कीच जाईन.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT