"Sanae Takaichi becomes Japan’s first female prime minister, marking a historic milestone for women’s representation in Japanese politics." Sarkarnama
देश

Japan PM update : जपानच्या संसदेने इतिहास घडवला; बहुमताशिवाय देशाला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान, काय घडलं?

Sanae Takaichi Makes History as Japan’s First Female Prime Minister : इशिबा यांना पंतप्रधानपदी केवळ एकच वर्षाचा कालावधी मिळाला. निवडणुकीतील पराभवानंतर एलडीपीने जपान इनोव्हेशन पक्षाशी आघाडी केली आहे.

Rajanand More

Japan first female prime minister : मागील काही महिन्यांपासून जपानमध्ये पंतप्रधानपदाबाबत सुरू असलेली उत्सुकता अखेर आज संपली. जपानच्या संसदेने इतिहास घडवत देशाला पहिल्या महिला पंतप्रधान मिळवून दिल्या आहेत. संसदेने पंतप्रधानपदी सनाई ताकाईची यांची निवड केली आहे. ताकाईची या कडव्या रूढीवादी नेत्या म्हणून जपानमध्ये ओळखल्या जातात.

ताकाईची यांनी शिगेरू इशिबा यांची जागा घेतली. त्यांनी नुकताच पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. जुलैमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांच्या लिबरल डेमोक्रेटिक पक्षावर मानहानीकारक पराभवाची नामुष्की ओढवली होती. त्यामुळे तेव्हापासून देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने पंतप्रधान कोण होणार, याबाबत प्रचंड उत्सुकता होती.

इशिबा यांना पंतप्रधानपदी केवळ एकच वर्षाचा कालावधी मिळाला. निवडणुकीतील पराभवानंतर एलडीपीने जपान इनोव्हेशन पक्षाशी आघाडी केली आहे. पण त्यानंतरही त्यांच्या आघाडीला संसदेत बहुमत मिळाले नाही. त्यामुळे त्यांच्या सरकारवर अस्थिरतेची टांगती तलवार राहणार आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये ताकाईची यांचे सरकार बहुमतापासून दूर आहे. तसेच देशात विरोधी पक्षातही एकी नाही.

संसदेत बहुमत नसल्याने ताकाईची यांना कोणतेही विधेयक पारित करण्यासाठी इतर विरोधी पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या सरकारचे भवितव्य विरोधी पक्षांच्या हातात राहणार असल्याची सध्याची स्थिती आहे. जपान इनोव्हेशन पक्षासोबतच्या युती करारावर सोमवारी सही करताना ताकाईची म्हणाल्या होत्या की, सध्या देशात राजकीय स्थैर्य महत्वाचे आहे. त्याशिवाय आपण मजबूत अर्थव्यवस्था आणि धोरणे प्रभावीपणे राबवू शकत नाही. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताकाईची यांचे अभिनंदन केले आहे.

कोण आहेत ताकाईची?

ताकाईची या 64 वर्षांच्या असून राजकारणात पाऊल ठेवले त्यावेळी त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. 1993 मध्ये पहिल्यांदा त्यांनी निवडणूक लढवली आणि संसदेत पोहचल्या. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या त्या समर्थक मानल्या जातात. ताकाईची यांनी आर्थिक सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा आणि लैंगिक समानता यांसह विविध मुद्द्यांवर काम केले आहे. अति रुढीवादी नेत्या म्हणून त्यांची ओळख आहे. चीनविषयी त्यांची भूमिका अत्यंत कठोर मानली जाते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT