Rahul Gandhi Video : आता तुमच्या लग्नाची वाट पाहतोय..! 237 वर्षे जुन्या मिठाईच्या दुकानात राहुल गांधींचा अनोखा अंदाज...

Rahul Gandhi Visits 237-Year-Old Ghantewala Sweet Shop in Delhi : राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दुकानातील मालक व इतरांसोबतचा संवादही आहे. राहुल गांधींनी भेट दिलेले घंटेवाला मिठाई दुकान 237 वर्षांपूर्वीचे आहे.
Rahul Gandhi making besan laddus and imarti during his visit to Delhi’s 237-year-old Ghantewala sweet shop.
Rahul Gandhi making besan laddus and imarti during his visit to Delhi’s 237-year-old Ghantewala sweet shop.Sarkarnama
Published on
Updated on

Historic Significance of Delhi’s Ghantewala Sweet Shop : देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही अनोख्या पध्दतीने दिवाळी सेलिब्रेशन केले. त्यांनी सोमवारी दिल्लीतील प्रसिध्द आणि ऐतिहासिक घंटेवाला मिठाई दुकानात जाऊन बेसनाचे लाडू, इमरती तयार करण्याचा आनंद लुटला. राहुल यांनी सोशल मीडियातून याची माहिती दिली आहे.

राहुल यांनी मिठाई बनवितानाचा व्हिडीओही सोशल मीडियात पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्षे जुन्या असलेल्या या प्रतिष्ठित दुकानाचा गोडवा आजही तोच आहे, शुध्द, पारंपरिक आणि मनाला भिडणारी. दिवाळीचा खरा गोडवा केवळ थाळीत नाही तर नाती आणि समाजातही असतो. तुम्ही सर्वांनी सांगा, तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी करत आहात आणि कशी खास बनवत आहात?

राहुल गांधी यांनी पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दुकानातील मालक व इतरांसोबतचा संवादही आहे. राहुल यांनी मिठाई बनविण्याची संपर्ण प्रक्रियाही समजून घेतली. इमरतीची सुरूवात कधीपासून झाली, इतर मिठाईची माहितीही त्यांनी घेतली. त्याचप्रमाणे इमरती आणि बेसनाचे लाडूही बनविले.

Rahul Gandhi making besan laddus and imarti during his visit to Delhi’s 237-year-old Ghantewala sweet shop.
Raj Thackeray news : केंद्रीय मंत्र्यांचा राज ठाकरेंवर घाव; मुंबई अन् गुजरातचे मजबूत नाते सांगत म्हणाले, महाराष्ट्राच्या भल्यासाठी...

ऐतिहासिक मिठाई दुकान

राहुल गांधींनी भेट दिलेले घंटेवाला मिठाई दुकान 237 वर्षांपूर्वीचे आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून राजीव गांधीपर्यंत गांधी कुटुंबातील सर्वचजण या दुकानातील मिठाचे चाहते होते. विशेष म्हणजे राजीव गांधी यांच्या लग्नातही या दुकानातूनच मिठाई पाठविण्यात आली होती. दुकानाच्या मालकांनी राहुल गांधींना त्याची आठवण करून दिली.

Rahul Gandhi making besan laddus and imarti during his visit to Delhi’s 237-year-old Ghantewala sweet shop.
Rahul Gandhi News : राहुल गांधींचे ‘बब्बर शेर’च काँग्रेसची बोट बुडवणार? ऐन रणधुमाळीत, हे वागणं बरं नव्हं!

दुकानाचे मालक म्हणाले, ‘आपण जवाहरलाल नेहरूंपासून तुमची बहीण प्रियांका गांधींपर्यंत सगळ्यांना मिठाई खाऊ घातली आहे. आता आम्ही तुमच्या लग्नाची वाट पहातोय. तुम्ही लवकर लग्न करा आणि आमच्याकडूनही मिठाई न्या.’ दोघांमधील या संवादाला मिठाई दुकान मालकाचे कुटुंबीय आणि दुकानातील कर्मचाराऱ्यांनीही दाद दिली. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com