
Impact of Tariffs on India–US Trade Relations : भारतात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कडक इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांनी आयात शुल्कामध्ये मोठी वाढ करण्याचे संकेत दिले आहेत. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करणे भारताने थांबवले नाही तर भारताला मोठी टेरिफ द्यावे लागेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
मीडियाशी बोलताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर आगपाखड केली आहे. ते म्हणाले, ‘मी पंतप्रधान मोदी यांच्याशी बोललो होतो. भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे ते म्हणाले होते. त्यांनी असे केले नाही तर त्यांना मोठा टॅरिफ द्यावा लागेल.’ ट्रम्प यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींचे नाव घेत असा इशारा दिला आहे. मात्र, भारताने हे दावे फेटाळून लावले आहेत.
भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे सुरूच ठेवले आहे. भारत झुकण्यास तयार नसल्याने ट्रम्प यांच्याकडून ऐन दिवाळीत भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकला जाणार का, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. दरम्यान, ट्रम्प प्रशासनाच्या म्हणणे आहे की, रशियाकडून तेल खरेदी करत संबंधित देश यूक्रेन युध्दात अप्रत्यक्षपणे रशियाला आर्थिक मदत करत आहेत. त्यामुळे अमेरिका सातत्याने या देशांवर दबाव टाकत आहे.
भारतासह अन्य काही देशांकडूनही रशियातील तेल खरेदी केले जात आहे. त्यामुळे भारतावर ५१ टक्के टॅरिफ लादण्यात आले आहे. काही देशांवर यापेक्षा अधिक टॅरिफ लावण्यात आल्याने ट्रम्प सरकारविरोधात प्रचंड नाराजी आहे. पण त्यानंतरही ट्रम्प यांच्याकडून सातत्याने आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत या देशांना धमकी दिली जात आहे.
रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी आश्वासन दिल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने यापूर्वीच फेटाळून लावला आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटले होते की, भारताच्या ऊर्जा धोरणाचा उद्देश आपल्या ग्राहकांच्या हितांचे रक्षण करणे हा आहे. भारत एक जबाबदार ऊर्जा आयातदार देश आहे. आम्ही आमचे निर्णय स्वतंत्रपणे घेतो, जेणेकरून किंमत स्थिर राहील आणि पुरवठ्यामध्ये विविधता असेल. आपली प्राथमिकता ही कोणत्याही राजकीय दबावात येणे ही नसून आर्थिक संतुलन आणि घरगुती गरजा पूर्ण करणे ही आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.