Sanjay Raut in Rajya sabha Sarkarnama
देश

Sanjay Raut in Rajya Sabha : नेहरू तर महान, पण सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवून..! राऊतांचा राज्यसभेत जोरदार प्रहार

Sanjay Raut’s Bold Statement in Rajya Sabha : पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून राजीनामा देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायला हवा. ही त्यांची जबाबदारी आहे, असे संजय राऊत राज्यसभेत म्हणाले.

Rajanand More

Nehru Sardar Patel controversy : ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सत्ताधाऱ्यांवर जोरदार प्रहार केला. सरदार पटेल आणखी दहा वर्षे जिवंत असते तर हे लोक समोर दिसलेही नसते, असा निशाणा राऊतांनी साधला आहे.

राज्यसभेत बोलताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. ते म्हणाले, पहलगाममध्ये 26 लोकांची हत्या कशी झाली, हे सरकार अजून सांगू शकलेले नाही. संपूर्ण काश्मीर गृह मंत्रालयाच्या अंतर्गत आहे. तेथील पोलिस गृह मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करते. तिथले गव्हर्नरही तुमचे आहेत. त्यांनीही सुरक्षेत चूक झाल्याचे मान्य केले आहे. त्याची जबाबदारी कोण घेणार आणि राजीनामा कोण देणार? पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प देणार?, असा सवाल राऊतांनी केला.

राजीनामा देशाच्या गृहमंत्र्यांनी द्यायला हवा. ही त्यांची जबाबदारी आहे. या देशात 24 तासांत उपराष्ट्रपतींचा राजीनामा घेतला जातो, कारण ते तुमचे ऐकत नाहीत. पण 26 लोकांची हत्या होऊनही कुणाचा राजीनामा नाही, कुणाची माफी नाही. ही या देशाची स्थिती असल्याची टीकाही राऊतांनी केली.

कालपासून मी राजनाथ सिंग, विदेश मंत्री, नड्डा यांची भाषणे ऐकली. सगळ्यांना पंडित नेहरूंची खूप आठवण येत होती. तुम्ही भूतकाळात खूप फिरतात. पंडित नेहरू त्यांना झोपूही देत नाहीत आणि जगूही देत नाहीत. सरदार पटेलांचीही त्यांना आठवण येते. नेहरू तर महान होते, पण सरदार पटेल यांना पंतप्रधान न बनवून आपण ऐतिहासिक चूक केली, असे राऊत म्हणाले.

नेहरू हे डेमोक्रेटिक होते आणि सरदार पटेल लोहपुरूष होते. त्यांनीच पहिल्यांदा आरएसएसवर बंदी घातली होती. पटेल आणखी दहा वर्षे जिवंत असते तर हे लोक (सत्ताधारी बाकांकडे हात दाखवून) समोर दिसलेही नसते. त्यामुळे तुम्हाला पंडित नेहरूंचे आभार मानायला हवेत. त्यांच्यामुळे तुम्ही इथे बसला आहात. राज्य करत आहात. ही पंडित नेहरूंची मेहरबानी आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते तर तुम्ही सत्तेतच नाही तर देशातही दिसला नसता, उखडून टाकले असते, असा हल्ला राऊतांनी चढवला.

आपण शस्त्रसंधी केली, त्यातून आपल्याला काय मिळाले. पीओकेवर चर्चा व्हायला हवी होती. किमान मागील 15 वर्षांपासून पाकिस्तानच्या जेलमध्ये कुलभूषण जाधव तिथे आहेत, त्यांची सुटका करायला हवी होती, असे राऊत म्हणाले. पण त्यांचा वेळ संपल्याने माईक बंद करण्यात आला आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण बोलण्यासाठी उभे राहिले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT