Supriya Sule in Lok Sabha : सुप्रिया सुळेंकडून लोकसभेत फडणवीसांच्या खात्यावर आरोप; थेट अमित शहांकडे केली मोठी मागणी

Incident Overview: Santosh Deshmukh & Mahadev Munde Murders : संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पध्दतीने हत्या झाल्या. पण दुर्दैवाने महाराष्ट्राचे गृह मंत्रालय अजूनही त्यावर काही अॅक्शन घेत नाही, असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे.
Supriya Sule in Lok Sabha
Supriya Sule in Lok SabhaSarkarnama
Published on
Updated on

Supriya Sule’s Allegations Against Maharashtra Home Ministry : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी लोकसभेत महाराष्ट्राच्या गृह खात्यावर गंभीर आरोप केला. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पध्दतीने हत्या झाल्या. सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली. पण महाराष्ट्राचे गृह मंत्रालय अजूनही त्यावर काही अॅक्शन घेत नाही, असा आरोप खासदार सुळेंनी केला आहे.

लोकसभेत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाचा असा बीड जिल्हा आहे. अतिशय सुसंस्कृत जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठं योगदान बीड जिल्ह्याचे राहिले आहे. भाजपचे महत्वाचे नेते राहिलेले गोपीनाथ मुंडेही बीड जिल्ह्यातील होते. पण दुर्दैवाने एक-दोन वर्षांत बीड जिल्ह्यात अनेक घटना घडल्या आहेत, ज्या महाराष्ट्राला आणि माणुसकीला न शोभणाऱ्या आहेत.

संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या अतिशय क्रूर पध्दतीने हत्या झाल्या. सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्याची निंदा केली. ही अयोग्य घटना झाली, हे मान्य करता. पण दुर्दैवाने महाराष्ट्राचे गृह मंत्रालय अजूनही त्यावर काही अॅक्शन घेत नाही. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे या दोघांसह अशा अनेक केसेस त्या भागात झाल्या, ज्यांच्या क्रूर हत्या झाल्या आहेत, त्या कुटुंबांना मिळत नाही, असे खासदार सुळे म्हणाल्या.

Supriya Sule in Lok Sabha
Bihar Corruption : चारा घोटाळ्यापेक्षा 70 पटीहून अधिक लूट; ‘कॅग’च्या अहवालाने NDA सरकारचा पर्दाफाश?

देशमुख आणि मुंडे कुटुंबातील सगळी लोकं न्याय मागण्यासाठी सगळीकडे फिरत आहेत. आमदार, खासदारांना भेटत आहेत. मीही त्यांची भेट घेतली. आम्ही ताकदीने माणुसकीच्या नात्याने त्यांच्यासोबत उभे आहोत. महाराष्ट्र सरकार त्यांना न्याय देत नाही. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्याची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी गृह मंत्रालयाकडे केली.

Supriya Sule in Lok Sabha
Donald Trump on India : ट्रम्प यांनी काही तासांतच पंतप्रधान मोदींच्या संसदेतील मेहनतीवर फिरवलं पाणी

दरम्यान, यापूर्वी सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीच्या अन्य खासदारांनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे प्रकरणावर लोकसभेत भूमिका मांडली होती. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेत विविध प्रकरणांची सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com