
PM Narendra Modi in Parliament : ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत विरोधकांचे दावे आणि आरोपांचा खरपूस समाचार घेतला. विरोधकांचे सगळे दावे खोडून काढत त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेवर शिक्कामोर्तब केले. यावेळी त्यांनी जगातील कोणत्याही नेत्याचा शस्त्रसंधीसाठी दबाव नसल्याचेही मोदींनी ठामपणे सांगितले.
पंतप्रधान मोदींच्या संसदेतील या मेहनतीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांतच पाणी फिरवलं आहे. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विनंतीवरूनच भारताने युध्द थांबवल्याचा दावा केला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 25 हून अधिकवेळा ते असे बोलले आहेत. त्यामुळे आता नेमकं खरं काय, याबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी बोलताना पंतप्रधानांना चॅलेंज केले होते. त्यांनी ट्रम्प यांचे नाव घेत ते खोटारडे आहेत, हे संसदेत सांगावे, असे आव्हान राहुल यांनी दिले होते. मात्र, पंतप्रधानांनी आपल्या भाषणात एकदाही ट्रम्प यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. जगातील कोणत्याही नेत्याचा दबाव नसल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावर सत्ताधारी बाकांवरील सदस्यांनी मोदी-मोदीचा जय़घोष केला होता.
पंतप्रधान मोदींनी केवळ अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा आपल्याला फोन आल्याचे सांगितले. ते एक तास फोन करत होते. दोघांचे फोनवर बोलणे झाल्यानंतर उपराष्ट्राध्यक्षांनी पाकिस्तान मोठा हल्ला करणार असल्याचे सांगितले होते. त्यावर मी त्यांना जशास जसे उत्तर दिले जाईल, असे सांगितल्याचे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणादरम्यान संसदेत सांगितले होते.
ट्रम्प यांचे नाव न घेता मोदींकडून विरोधकांचे दावे खोडून काढण्यात आले होते. पण मोदींची भाषण झाल्यानंतर काही तासांतच ट्रम्प पुन्हा या मुद्दायवर बोलले आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ट्रम्प यांना भारतावर 20 ते 25 टक्के टेरिफ लावण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला होता.
त्यावर ट्रम्प म्हणाले, होय, असे मला वाटते. भारत हा माझा मित्र आहे. त्यांनी माझ्य विनंतीवरून पाकिस्तानसोबतचे युध्द थांबवले. भारतासोबतची डील अंतिम झालेली नाही. भारत चांगला मित्र असला तरी इतर बहुतेक देशांच्या तुलनेत भारताकडून अधिक टेरिफ आकारला जात असल्याची नाराजीही ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.