कोल्हापूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा. 5 राज्यांतील विधानसभेच्या जागांसाठी मतदान संपवून आता इथे निकालाकडे लक्ष लागले आहे. मात्र त्याआधीच एक्झिट पोलने गोव्यातील राजकीय गोंधळ वाढवला आहे. या राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार याबाबत कोणत्याही एक्झिट पोल एक वाक्यता दिसून येत नाही. काही एक्झिट पोल्समध्ये भाजप बहुमताने सरकार स्थापन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे, तर काहींमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन होत असल्याचे दिसून येत आहे. अशा स्थितीत भाजप आणि काँग्रेसने सर्व पर्यायांचा विचार सुरू केला आहे, त्यामुळे दोन्ही पक्षांचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान आता गोव्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) गोव्यात जाण्याची शक्यता आहे. तर तृणमूलमधूनही अभिषेक बनर्जी, प्रशांत किशोर, डेरेक ओ ब्रायन गोव्यात दाखल हे नेते गोव्यात दाखल झाले आहेत. एका बाजूला हे चित्र असताना दूसऱ्या बाजूला मात्र गोव्यातील ही सत्ता सुत्र ही महाराष्ट्रातून आणि त्यातही कोल्हापूरमधून हालणार आहेत. कारण काँग्रेसने राज्यातील नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे.
2017 मध्ये काँग्रेसकडे सर्वाधिक जागा आणि भाजप दोन नंबरला असूनही भाजपने गोव्यात सरकार स्थापन केले, असाच प्रयत्न यावेळी होऊ शकतो. हेच टाळण्यासाठी कॉंग्रेसने निकालाच्या दोन दिवस आधीच तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने भाजपविरोधी कोणत्याही पक्षासोबत युती करणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय फोडाफोडीच्या राजकारणापासून वाचण्यासाठी कॉंग्रेसने आपल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये हलवण्याची तयारी केली आहे. निवडून आलेल्या प्रत्येक उमेदवाराच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
याच कामगिरीची जबाबदारी काँग्रेसने सतेज पाटील जबाबदारी सोपवली आहे. इतर पक्ष आपल्या नेत्यांना फोडून त्यांच्या पक्षात सामील करून घेऊ नयेत म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांना कोल्हापूर किंवा राजस्थानमध्ये हलवले जाऊ शकते. 40 विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या गोव्यात कॉंग्रेसला 12-16, भाजपला 13- 17, आम आदमी पक्ष 1-5 आणि महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाला 5-9 तर इतर 0-2 जागा मिळतील असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.