नितीन राऊतांवर हायकमांड नाराज; राजीनामा घेणाऱ्या ४ मंत्र्यांपैकी एक नाव ठरलं?

Nitin Raut | Congress | Mahavikas Aaghadi : एक-दोन नाही तर तब्बल चार मंत्र्यांचे राजीनामे काॅंग्रेस घेणार!
Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity bill
Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity billsarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) च्या सत्तास्थानात बसूनही गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत नेमका लाभ पदरात पडत नसल्याच्या जाणिवेतून काँग्रेसने (Congress) थेट आपल्या चार मंत्र्यांना घरी बसविण्याचा पवित्रा घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यात ३ कॅबिनेट आणि एका राज्यमंत्र्याच्या कामगिरीवर पक्षश्रेष्ठी समाधानी नसल्याने या मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याजागी आक्रमक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते. त्यामुळे नेमक्या कोणत्या मंत्र्याला डच्चू मिळणार आणि कोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, याची उत्सुकता आहे.

मात्र यात एक नाव ठरलं असल्याची माहिती आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या कामावर हायकमांड नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून उर्जा खाते काँग्रेसकडे आहे आणि नितीन राऊत या खात्याचे मंत्री आहेत. राऊत यांच्या खात्याबाबत दोन तक्रारी सातत्याने येत आहेत. यात एक म्हणजे शेतकरी आणि सामान्य जनतेची केली जाणारी वीजतोडणी आणि दुसरी मुंबई-पुणे सारख्या महत्वाच्या शहरांमध्ये खंडित होणारा वीजपुरवठा.

Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity bill
राज्यपाल-ठाकरे सरकार वादावर न्यायालयाच्या कानपिचक्या: महाजनांची याचिकाही फेटाळली

एका बाजूला वीज तोडणीची ठाम भूमिका घेतल्यामुळे उर्जा विभागावर आणि काँग्रेसवर ग्रामीण भागातील जनतेत आणि शेतकऱ्यांमध्ये काँग्रेसच्या प्रति बराच रोष आहे. विरोधी पक्ष भाजपनेही या विरोधात आवाज उठवला असून वीजतोडणीला विरोध दर्शवला आहे. मागील आठवड्यात एका शेतकऱ्याने वीज तोडणीच्या या भूमिकेमुळे फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केली होती. मध्यंतरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनादरम्यान वीज तोडणी थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र अधिवेशन संपताच ही तोडणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

Nitin Raut News Updates: Nitin Raut on electricity bill
निकाल लागला! निवडणुकीत काँग्रेसची धूळधाण; भाजपचा एकहाती विजय

शहरी भागातील खंडित होणारा वीजपुरवठा आणि ग्रामीण भागात तोडली जाणारी वीज यांमुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील जनता काँग्रेसवर नाराज आहे. तर त्याचवेळी राहुल गांधी यांनी अलिकडेच ५ राज्यांतील निवडणूक प्रचारादरम्यान एका प्रमाणापर्यंत वीज मोफत देण्याचे वचन दिले आहे. याच विरोधाभासामुळे काँग्रेस हायकमांड राऊत यांच्यावर नाराज असल्याची माहिती आहे. विधिमंडळाचे अधिवेशन आटोपताच मंत्रीमंडळात बदल होण्याची चिन्हे असून, सरकारमधील चुका १० मार्चनंतर दुरुस्त केल्या जाणार असल्याचे सांगून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाकरी फिरविण्याचेच संकेत दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.