supreme court Sarkarnama
देश

SC Reservation : एससी,एसटी आरक्षणासाठी क्रिमी लेअर लागू करा? 'त्या' याचिकेवर कोर्टात सरकारने मांडली बाजू

SC ST Reservation Creamy Layer : इंदिरा साहनी प्रकरणाचा हवाला देताना सरकारने सांगितले की, एसएसी, एसटी आणि ओबीसीची ओळख ही ऐतिहासिक सामाजिक मागसलेपण आणि शैक्षणिक मागसलेपणाच्या आणि आर्थिक स्थितीपरच फक्त नाही.

Roshan More

Reservation News : सुप्रीम कोर्टात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) यांच्या आरक्षणात क्रिमीलेअर लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणीत केंद्र सरकारने आपले मत मांडले.

केंद्र सरकारने स्पष्ट केले की, 'एससी एसटीला क्रिमी लेअर लागू करता येणार नाही. जे आरक्षण दिले जाते ते सामाजिक भेदभावाच्या आधारावर दिले जाते. या आरक्षण व्यवस्थेत क्रिमी लेअर तत्व लागू होऊ शकत नाही.'

केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की, जो कायदा आहे त्या कायद्याकडे ही याचिका दुर्लक्ष करते. इंदिरा साहनी प्रकरणाचा हवाला देताना सरकारने सांगितले की, एसएसी, एसटी आणि ओबीसीची ओळख ही ऐतिहासिक सामाजिक मागसलेपण आणि शैक्षणिक मागसलेपणाच्या आणि आर्थिक स्थितीपरच फक्त नाही.

'तो' अधिकार संसदेचा

सामाजिक न्याय मंत्रालयाने देखील स्पष्ट केले की, एससी,एसटीच्या सूचीमध्ये बदल संसद करू शकते. संविधानाच्या कलम 341 आणि 342 नुसार एससी एसएसटी सूचीमध्ये कोणाला समाविष्ठ करायेच आणि कोणाला वगळायचे याचा निर्णय संसद घेते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT