Seema Haidar Sarkarnama
देश

Seema Haidar News: सीमा हैदर नुकसान करेल, तिला भारतातून परत पाठवा; मुंबई पोलिसांना पाकिस्तानातून फोन

National Security News: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर'ची सध्या उलटसुलट चर्चा आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Police Gets Call from Pakistan: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर'ची सध्या उलटसुलट चर्चा आहे. आपल्या प्रेमासाठी बेकायदेशीररित्या पाकिस्तानातून भारतात प्रवेश करत ती उत्तर प्रदेशातील आपल्या प्रियकराकडे पोहचली. अशातच तिच्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सीमा हैदर पाकिस्तानी एजंट असून तिला भारतातून परत पाठवा, अशी मागणी करणारा मेसेज पाकिस्तानहून मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला आहे. सीमा ही भारताचं मोठं नुकसान करेल हे शेवटचं सांगणं आहे, असंही या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे. इरफान नावाच्या व्यक्तीने हा मेसेज केला आहे.

सीमा हैदरवरही पाकिस्तानी गुप्तहेर असल्याचा आरोप होत आहे. युपी दहशतवाद विरोधी पथकाने तिला ताब्यात घेतलं आहे. सीमा हैदर सुरुवातीपासून एटीएसच्या रडारवर होती. ती तिचा प्रियकर सचिनला भेटण्यासाठी नेपाळमार्गे भारतात आल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुराव्याच्या आधारे एटीएसचे पथक तिची चौकशी करत आहे. या मेसेजची वस्तुस्थिती आता पोलीस पडताळून पाहत आहेत. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर सध्या पाकिस्तानातील सीमा हैदर चांगलीच चर्चेत आहे. प्रियकर सचिन मीणासोबत राहण्यासाठी सीमा पाकिस्तान सोडून नेपाळ मार्गे चार मुलांना घेऊन भारतात आली आहे.

सीमाची ओळखपत्रे उच्चायुक्तांना पाठवण्यात आली आहेत. सीमाचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार असून सीमाचा भाऊ पाकिस्तानी सैनिक असल्याची माहितीही समोर आली आहे. भारताची सुरक्षा एजन्सी आता सीमाची चौकशी करणार आहे. प्रेमकथेपासून ते भारतात येण्यापर्यंतचा प्रवास, या सर्व बाबींवर तिची चौकशी सुरू आहे. दरम्यान, सीमा ही पाकिस्तानी नागरिक आहे आणि तिच्या येण्यामध्ये अनेक कारणेही आहेत. अशा परिस्थितीत तिची चौकशी करणे आवश्यक असल्याने देशाच्या सुरक्षेशी निगडित अशा सर्व यंत्रणा त्याची चौकशी करतील., असं उत्तर प्रदेशातील एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT