

Delhi News : भाजपच्या विरोधक पक्षांची आज कर्नाटकात राजधानी बंगळुरुमध्ये बैठक पार पडणार आहे. विरोधकांची ही रणनीती ठरत असतानाच देशाची राजधानी दिल्ली येथे भाजप्रणित एनडीएने देखील बैठक आयोजित केली आहे. एनडीएच्या या बैठकीत एकूण ३८ पक्ष स्थापन होणार असल्याची माहिती आहे. सायंकाळी ५ वाजता ही बैठक पार पडणार आहे. (Latest Marathi News)
दरम्यान, एनडीएच्या या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि प्रफुल्ल पटेल (Praful Patel) हे नेते बैठकीला हजर राहणार आहेत.
एनडीएच्या या बैठकीला भाजप काही जुने मित्रपक्षही उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. मध्यंतरी भाजपपासून दुरावलेले अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंह बादल, तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू देखील पुन्हा एनडीएमध्ये येण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती आहे. तसेच लोक जनशक्ती पार्टीचे चिराग पासवान हे ही एनडीएला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपने ही बैठक आयोजित केली आहे. या बैठकीविषयी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले, "एनडीएची बैठक ही सत्ता मिळवण्यासाठी नाही तर लोकांची-देशाची सेवा करावे,यासाठी पार पडत आहे. एनडीएचा 25 वा वर्धापनदिन आहे. या निमित्ताने या शक्तिप्रदर्शनासाठी एकूण 38 पक्ष सहभागी होणार आहेत," असं जेपी नड्डा म्हणाले.
एनडीएमधून बाहेर पडलेले मित्रपक्ष पुन्हा एनडीएत येत आहेत. भाजप आपल्या विचारांशी कटीबद्ध आहे. कृषी कायद्यांमुळे व इतर काही मुद्द्यांमुळे मित्रपक्ष दुरावले होते. आता ते पुन्हा आमच्यासोबत येत आहेत. भाजपप्रणित एनडीएच्या मित्रपक्षांची संख्या 1998 साली 24 इतकी होती. आज एनडीएचे मित्रपक्षांची संख्या ३८ इतकी झाली आहे, असं भाजपकडून सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.