Prajwal Revanna Sarkarnama
देश

Sex Scandal Case : कर्नाटकात मोठी घडामोड; देवेगौडांचा नातू पक्षातून निलंबित

Karnataka MP Prajwal Revanna News : घरकाम करणाऱ्या महिलेच्या तक्रारीनंतर प्रज्वल रेवन्ना आणि त्यांच्या वडिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांची एसआयटी चौकशीही सुरू आहे.

Rajanand More

Karnataka News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहाेचलेला असतानाच कर्नाटकात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. सेक्स स्कँडलमध्ये अडकलेले खासदार प्रज्वल रेवन्ना यांच्यावर जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाने कारवाई केली. त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन मागे घेतले जाणार नाही.

प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू तर माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतणे आहेत. सेक्स स्कॅंडल प्रकरणामुळे ऐन लोकसभा निवणुकीत देवेगौडा कुटुंबासह त्यांच्या जेडीएस (JDS) पक्षावर मोठी नामुष्की ओढवली आहे. त्यामुळे प्रज्वल यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी पक्षातूनच जोर धरत होती.

आज पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक कुमारस्वामी यांच्या उपस्थितीत झाली. या बैठकीत पक्षाच्या अध्यक्षांच्या शिफारशीनुसार प्रज्वल यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रज्वल यांचे वडील आमदार एच. डी. रेवन्ना यांच्यावर मात्र कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. प्रज्वल यांची या प्रकरणी चौकशी सुरू असून ती पूर्ण होईपर्यंत त्यांचे निलंबन कायम राहील, असे कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय आहे प्रकरण?

कर्नाटकातील पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वीच प्रज्वल यांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले. प्रज्वल हे स्वत: हसन मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यामुळे जेडीएससह भाजपच्या (BJP) अडचणीही वाढल्या. त्यानंतर प्रज्वल यांच्याच घरातील स्वयंपाकी महिलेनेही प्रज्वल यांच्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप केला. या महिलेच्या तक्रारीनंतर प्रज्वल यांच्यासह वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपचे नेते देवराजे गौडा (HD Deve Gowda) यांचे एक पत्र नुकतेच समोर आले आहे. त्यांनी मागील वर्षी डिसेंबर महिन्यातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांना हे पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी आपल्याकडे महिलांच्या लैंगिक शोषणाचे तीन हजार व्हिडिओ असलेले पेनड्राइव्ह असल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओंचा वापर करून संबंधित महिलांना ब्लॅकमेल केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT