PM Narendra Modi News : …त्यांनी माझ्या गृहमंत्र्यांना जेलमध्ये टाकले होते! मोदींना झाली शाहांची आठवण

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विरोधकांकडून ईडीसह इतर तपास यंत्रणांच्या कारवाईवरून सरकारवर टीका केली जात आहे. मोदींनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहाेचला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून (PM Narendra Modi News) विरोधकांवर सातत्याने निशाणा साधला जात आहे. प्रामुख्याने मोदींकडून काँग्रेसला लक्ष्य करण्यात येत आहे, तर काँग्रेसही ईडी, सीबीआय तसेच इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून मोदींवर टीका करत आहे. त्यावरूनही मोदींनी विरोधकांवर पलटवार केला आहे.

2014 पर्यंत ईडी (ED) आणि सीबीआय (CBI) काँग्रेसच्या हातातील कठपुतली होती, अशी टीका मोदींनी केली आहे. ‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी विविध मुद्द्यांवरून विरोधकांना धारेवर धरले. ईडी, सीबीआय हातात असूनही त्यावेळी ते निवडणूक (Election) का हरले? देशात महापालिकेची निवडणूकही फिक्स केली जाऊ शकत नाही. विरोधक जगाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा हल्ला मोदींनी चढवला.

PM Narendra Modi
Sex Scandal News : 3,000 हजार व्हिडिओ अन् ब्लॅकमेलिंग; देवेगौडा नातवाला पक्षातून काढणार?

विरोधक, राहुल गांधी (Rahul Gandhi), काँग्रेस आणि इतर सर्वजण म्हणत आहेत की, मोदी मॅच फिक्सिंग करत आहेत. ईडी, सीबीआय, ईव्हीएमशिवाय तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर मोदी म्हणाले, ईव्हीएमच्या विरोधकांच्या दाव्याला सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) उत्तर दिले आहे. 2014 मध्ये त्यांच्याजवळ ईडी आणि सीबीआय होती. मग ते का हरले? त्यांनी माझ्या गृहमंत्र्यांनाही (त्यावेळी गुजरात सरकारमध्ये अमित शाह गृहमंत्री होते) जेलमध्ये टाकले. त्यानंतरही ते का हरले?, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. (Lok Sabha Election 2024)

 (राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोदी म्हणाले, तुम्ही एवढ्या मोठ्या देशातील निवडणूक फिक्स करू शकत नाही. एका नगरपालिकेची निवडणूकही तुम्ही फिक्स करू शकत नाही. अशी फिक्सिंग शक्य आहे का? ते केवळ जगाला मूर्ख बनवत आहेत. मीडिया याबाबत त्यांना विचारण्याऐवजी आम्हालाच विचारत आहे, याची खंत वाटते. (Latest Political News)

मागील काही दिवसांत इंडी अलायन्सचे लोक निराश झाले आहेत. ते आता कारणं शोधत आहेत. कारण पराभूत झाल्यानंतर त्यांना जनतेचा सामना करायचा आहे. त्यामुळे ते आधीपासून अशी कारणं शोधत आहेत, असा टोला मोदींनी लगावला.

R

PM Narendra Modi
Revanth Reddy News : अमित शाहांचा ‘तो’ व्हिडिओ काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना भोवणार; दिल्ली पोलिसांची नोटीस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com