Sheikh Hasina Sarkarnama
देश

Shaikh Hasina : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढणार; 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Bangladesh Crime News : शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता.त्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप तेथील जनजीवन विस्कळीत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.

Deepak Kulkarni

Bangladesh News: बांगलादेशात काही दिवसांपूर्वी नोकऱ्यांमधील आरक्षणावरून हिंसाचार उफाळून आला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत देश सोडला होता.

त्या सध्या भारतात आश्रय घेत आहेत.तिकडे हिंसाचारात बांग्लादेश आणि तेथील जनता होरपळून निघत असताना आता दुसरीकडे माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बांगलादेशच्या (Bangladesh) माजी पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील माजी मंत्र्यांसह इतरांविरोधात आता 2015मध्ये एका वकिलाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील पीडित वकील सोहेल राणा यांनी अर्ज दाखल केला आहे.याबाबतची माहिती 'डेली स्टार' या वृत्तपत्राने दिली आहे.

काय आहे प्रकरण..?

देश सोडण्याची नामुष्की ओढावलेल्या माजी पंतप्रधान शेख हसीना (Shaikh Hasina) यांच्याविरुद्ध कायदेशीर लढाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. हसीना आणि मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्री, माजी गृहमंत्री असदुझ्झमन खान, माजी कायदा मंत्री अनिसुल हक, माजी पोलीस महानिरीक्षक (IGP) शाहिदुल हक, यांच्यासह रॅपिड ॲक्शन बटालियनचे (RAB)माजी महासंचालक बेनझीर अहमद यांच्यासह त्यांच्या बटालियनच्या 25 जणांचा समावेश आहे.

19 जुलै 2015 मध्ये मोहम्मदपूरमध्ये कोटा सुधारणा आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान पोलिसांना गोळीबार करावा लागला होता.या गोळीबारात अबू सईद नावाच्या एका किराणा दुकानदाराना जीव गमवावा लागला होता. याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्यावरुन तीव्र संतापाची लाट पसरली होती. तेथील जनता रस्त्यावर उतरल्यानंतर जाळपोळ, तोडफोड यांच्यासह मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला होता. पंतप्रधान पदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी विविध आक्रमक आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली होती.

त्यानंतर शेख हसीना यांना आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता.त्या भारतात आश्रयाला आल्या आहेत. बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप तेथील जनजीवन विस्कळीत असून परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT