Adway Hire News : ठाकरेंच्या पठ्ठ्यानं तुरुंगाबाहेर पाऊल ठेवताच शिंदे सरकारला अंगावर घेतलं; अद्वय हिरे म्हणाले...

Nashik ShivsenaUBT Politics : नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांच्याकडे पाहिले जाते. आगामी विधानसभा निवडणुकीत दादा भुसेंविरोधात अद्वय हिरे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात.
Advay Hire
Advay Hiresarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळाप्रकरणी गेल्या 9 महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे हे कारागृहात होते. कर्ज प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार बँकेने दाखल केल्यानंतर हिरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील वर्षी 15 नोव्हेंबरला हिरे यांना अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांची नाशिकच्या मध्यवर्ती तुरुगांत रवानगी करण्यात आली .

आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते अद्वय हिरे (Adway Hire) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. अद्वय हिरे हे आता तुरुंगातून बाहेर येणार आहेत.यापूर्वीही जामीन मिळण्यासाठी हिरे यांनी बरेच प्रयत्न होते. मात्र,त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते.आता अद्वय हिरे तुरुंगातून बाहेर येणार असल्यानं कारागृह परिसरात अद्वय हिरे समर्थकांची मोठी गर्दी जमली होती.

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे कट्टर विरोधक अद्वय हिरे यांच्याकडे पाहिले जाते.आगामी विधानसभा निवडणुकीत दादा भुसेंविरोधात अद्वय हिरे ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार असू शकतात. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे हिरेंच्या पाठीमागे आपली पूर्ण ताकद पणाला लावून भुसेंच्या विरोधात तगडं आव्हान उभे करु शकतात.

अद्वय हिरे यांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, आज आपल्या देशात काय चाललंय, आपण सगळे पाहत आहोत. या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकलं गेलं. या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्यात जे जे लढणार आहेत, त्या सर्वांना तुरुंगात जावं लागणार आहे. अजून पुन्हा तुरुंगात जाण्याची वेळ आली तर माझी पूर्णपणे तयारी असल्याचेही हिरे यांनी यावेळी सांगितले.

Advay Hire
Uday Samant News : उदय सामंतांचा 'करेक्ट कार्यक्रम' करण्यासाठी ठाकरेंचा 'राईट हँड' कोकणात दाखल; तगडा चेहरा शोधणार?

हिरे म्हणाले, ही दुसऱ्या स्वातंत्र्याची लढाई आमची निश्चितपणे चालू राहील. जामीन मंजूर केला. त्यावेळी हायकोर्टाने काय सांगितले हे जर आपण ऐकलं असतं, टीव्हीवर दाखवले असते तर मला अधिक आनंद झाला असता. याबद्दल मी जास्त बोलणं उचित नाही.न्यायालयाने जी भूमिका मांडलीय ती अतिशय स्पष्ट आहे. या केसमध्ये कुठलाही दम नाही,मी निश्चितपणे निर्दोष सुटेन. माझा न्यायालयावर विश्वास असल्याचेही हिरे यावेळी म्हणाले.

Advay Hire
Video Sambhaji Raje Chhatrapati : मोठी बातमी! संभाजीराजेंना मिळणार मनोज जरांगे पाटलांचे बळ, विधानसभा निवडणुकीत एकत्र येणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com