Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar Vs Ajit Pawar : तिकडे दुर्राणींनी साथ सोडली; इकडे 'या' महिला नेत्या अजितदादांच्या भेटीला, शरद पवारांना धक्का?

Sonia Duhan Meet Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान यांनी पक्षापासून अंतर राखल्याचं सांगितलं जात आहे.

Sunil Balasaheb Dhumal

NCP Political News : लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथ होताना दिसत आहेत. अजित पवारांची साथ सोडून परभणीतील नेते बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटात गेले. तर दुसरीकडे दिल्लीतील राजकारणात लेडी जेम्स अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे शरद पवार गटात नाराज असलेल्या दुहान लवकरच अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोनिया दुहान यांनी शरद पवार Sharad Pawar गटातील राष्ट्रीय युवती आघाडीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर धीरज शर्मा यांच्यासोबत सोनिया दुहानही अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीत धीरज शर्मा आणि सोनिया दुहान Sonia Duhan यांनी पक्षापासून अंतर राखल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर शनिवारी (ता. 27) सोनिया दुहान यांनी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी अजितदादांची भेट घेतली. या भेटीमुळे दुहान लवकरच अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या अत्यंत विश्वासू तरुण नेत्या अशी ओळख असलेल्या सोनिया दुहान यांनी सुप्रिया सुळेंना आमच्या लीडर होता आले नाही, अशी खंत व्यक्त केली होती. त्याचवेळी शरद पवार हे माझे दैवत आहेत, उद्याही ते दैवत असतील असे सांगत त्या शरद पवार गटातून बाहेर पडल्या. त्यानंतर अजित पवार गटाच्या एका बैठकीला उपस्थित राहूनही प्रवेशाबाबत बोलणे त्यांनी टाळले होते. आता झालेल्या दुहान आणि अजित पवारांच्या भेटीने त्यांच्या प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.

अजित पवार Ajit Pawar गटातील विधानपरिषदेचे माजी आमदार बाबजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी पवारांनी सोडून गेलेले पुन्हा विधिमंडळात दिसले नाहीत, अशी टिपण्णी करून इतिहासाची आठवण करून दिली. तर दुसरीकडे शरद पावर गटातील फायरब्रँड नेत्या सोनिया दुहान यांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यामुळे दुर्राणींच्या बदल्यात दुहान अशी चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT