Marathwada Congress : काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आता निलंगेकर नकोसे, बैठकीत भाषण थांबवल्याने गोंधळ..

Congress Leader Ashok Patil Nilangekar : काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांना अध्यक्षीय समारोप प्रसंगी आमदार अमित देशमुख गटातील एका कार्यकर्त्याने `आटोपते घ्या` असे म्हणत अडथळा आणला. यानंतर खवळलेल्या निलंगेकर समर्थकांनी आक्रमक होत थेट मेळाव्यातूनच बाहेर पडले.
Ashok Patil Nilangekar
Ashok Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

राम काळगे

Latur Congress Politics News : राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा राजकीय वारसा पुढे चालवणारे त्यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर यांचे नेतृत्व आता तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नकोसे झाले की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेस बुथप्रमुखांच्या मेळाव्यात प्रदेश सरचिटणीस असलेल्या अशोक पाटील निलंगेकर यांना `भाषण आटोपते घ्या` म्हणत रोखण्याचा प्रयत्न झाला.

त्यामुळे बैठकीत निलंगेकर समर्थक चांगलेच खवळले, नेत्याचा अपमान झाला म्हणून अशोक पाटील निलंगेकर यांच्यासह समर्थकांनी सभागृह सोडत बैठकीवर एकप्रकारे बहिष्कारच टाकला. लोकसभा निवडणुकीत (Congress) काँग्रेस-महाविकास आघाडीला जिल्ह्यात चांगले यश मिळाले. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी आणि कुरबुरी सुरू झाल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसकडून सुरू असलेल्या बुथ प्रमुखांच्या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांना अध्यक्षीय समारोप प्रसंगी आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) गटातील एका कार्यकर्त्याने `आटोपते घ्या` असे म्हणत अडथळा आणला. यानंतर खवळलेल्या निलंगेकर समर्थकांनी आक्रमक होत थेट मेळाव्यातूनच बाहेर पडले. त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला.

Ashok Patil Nilangekar
Latur NCP Politics : काँग्रेसने मतदारसंघावर दावा सांगताच विनायक पाटील पोहचले गढीवर ..

लोकसभा निवडणुकीत लातूरची जागा काँग्रेसला अर्थात महाविकास आघाडीला मिळाली आणि पक्षाला मोठा बुस्ट मिळाला. नवनिर्वाचित खासदार डाॅ. शिवाजी काळगे यांना निलंगा विधानसभा मतदार संघातून वीस हजारापेक्षा अधिकचे मताधिक्य मिळाले. भाजपचा विद्यमान आमदार असताना इथे काँग्रेसच्या उमेदवाराने मुसंडी मारल्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे.

याशिवाय विधानसभा इच्छुकांची संख्याही अचानक मतदारसंघात वाढली आहे. भावी आमदारांची तालुक्यात बॅनरबाजी सुरू झाल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. संभाव्य विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षाकडून सुरू आहे. निलंगा येथील बस्वेश्वर मंगल कार्यालयात निलंगा तालुक्यातील काँग्रेस बुथ प्रमुख व कार्यकर्त्यांचा मेळावा आज (ता.27) आयोजित करण्यात आला होता.

Ashok Patil Nilangekar
Congress In Mahavikas Aghadi : काँग्रेसचं विधानसभेसाठी पुढचं पाऊल, 10 नेते फायनल; जागा वाटपासाठी समिती ठरली

अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा घेण्यात आला. यासाठी व्यासपीठावर प्रदेश सचिव अभय सोळूंके, डाॅ. अरविंद भातांब्रे, माजी सभापती अजित माने, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. भाषण करणाऱ्यांची यादी मोठी असल्याने प्रत्येकाला थोडक्यात बोलण्याच्या सूचना दिल्या जात होत्या.

त्यातच अध्यक्षीय समारोचे अशोक पाटील निलंगेकर यांचे भाषण सुरू होते. त्याचवेळी वर्षभरापुर्वी भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले टि.टि. माने यांनी भाषणा दरम्यान कमी बोलण्याबाबतची सूचना केली. भाषण आटोपते घ्या, असे म्हणताच अशोकराव पाटील निलंगेकर समर्थक त्यांच्यावर भडकले.

Ashok Patil Nilangekar
Marathwada Congress Politics News : मराठवाड्यात तीन खासदार निवडून आल्याने काँग्रेसमध्ये जान आली..

नव्यानेच पक्षात येणाऱ्यांनी आम्हाल पक्षाची संस्कृती शिकवू नये, असा संताप व्यक्त करत निलंगेकर समर्थकांनी बैठकीवर अप्रत्यक्ष बहिष्कार टाकत सभागृह सोडले. त्यानंतर मंगल कार्यालयत शुकशूकाट पसरला. अशोकराव पाटील निलंगेकर हे काँग्रेसचे जेष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.

मतदार संघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन अशी अनेक पदे त्यांनी भुषवली आहेत. अशा अनुभवी नेत्याचा काल पक्षात आलेल्या पदाधिकाऱ्याने अशा प्रकारे अपमान करावा, हे खपवून घेणार नाही? असा इशारा संतप्त निलंगेकर समर्थकांनी यावेळी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com