Ajit Pawar, Sharad pawar Sarkarnama
देश

NCP Whip To MP : अग्निपरीक्षा ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून 'व्हीप' जारी; पाचही खासदारांमध्ये संभ्रम

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : केंद्र सरकारवरील अविश्वास ठरावाच्या चर्चेवरील गुरुवारी शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाल्यांनतर मतदान होणार आहे. या मतदानासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटाकडून वेगवेगळे 'व्हीप' बजविण्यात आले आहेत. त्यामुळे कोणता 'व्हीप' लागू होणार याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संसदेत पाच खासदार आहेत. त्यापैकी चार जण शरद पवार गटाचे आहेत तर एक जण अजित पवार गटाचा आहे. त्यामुळे 'व्हीप' कोणाचा लागू होणार याचा पेच निर्माण झाला आहे. (Latest Political News)

राष्ट्रवादीच्या दृष्टीने आता हे दोन 'व्हीप' निघणे हे आगामी काळात कायदेशीर लढायची सुरुवात मानली जात आहे. अजित पवार गटाकडून खासदार सुनील तटकरे यांनी व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून मोहम्मद फझल यांनी देखील 'व्हीप' काढलेला आहे. अर्थात आता राष्ट्रवादीचे खासदार कोणत्या गटाच्या 'व्हीप'चे पालन करतात कोणाच्या बाजूने मतदान हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडे चार खासदार असून त्यामध्ये सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे व श्रीनिवास पाटील हे महाराष्ट्रातील तिघे तर अन्य एक केरळचे खासदार आहेत दुसरीकडे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणानंतर संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा झाल्यांनतर गुरुवारी मतदान होणार आहे. त्या मतदानावेळी कोणता 'व्हीप' लागू होणार याबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.

दरम्यान, दिल्ली सेवा विधेयक लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आले. त्या विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षांतर्गत कारवाईचा मुद्दा अत्यंत चलाखीने टाळला होता. या मतदानासाठी शरद पवार यांच्या गटाकडून कोणताही 'व्हीप' लागू करण्यात आला नव्हता, तर अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल हे मतदानावेळी गैरहजर राहिले. त्यामुळे 'व्हीप' आणि त्या अनुंषगाने होणारी कारवाईचा प्रश्नच निर्माण झाला नाही. याता मात्र दोन्ही गटाकडून 'व्हीप' जारी करण्यात आल्याने कोणत्या गटाचा 'व्हीप' लागू होणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT