Sanjay Raut On Flying Kiss : राहुल गांधींनी 'फ्लाईंग किस' दिला तर त्यात काय झालं? राऊतांनी केलं समर्थन !

Sanjay Raut On Rahul Gandhi Flying Kiss Controversy : "राहुल गांधींविरोधात तक्रार करणाऱ्या भाजपच्या खासदार महिलांनी कधी आवाज उठवला आहे का?"
Sanjay Raut Rahul Gandhi
Sanjay Raut Rahul GandhiSarkarnama

Mumbai News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधींनी सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर संसदेत हजेरी लावून मोदी सरकार विरोधात जोरदार भाषण केले. भाषणानंतर मात्र गांधींनी 'फ्लाईंग किस' भाजपने त्यांना घेरले आहे. त्यांच्या या कृतीवर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी आक्षेप घेतला आहे. तसेच, सत्ताधारी पक्षांच्या २२ खासदारांनी गांधीविरोधात कारवाई करण्याची मागणीचे पत्र दिले. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या फ्लाईंग समर्थन करत, या कृतीमुळे काय झालं? असा सवाल भाजपला केला आहे.

Sanjay Raut Rahul Gandhi
Amit Shah Attack On Sharad Pawar : राज्यात सरकार पाडण्याची परंपरा शरद पवारांनी सुरू केली; अमित शाहांचा घणाघात

राहुल गांधी यांच्या फ्लाईंग किस कृतीबाबत प्रश्न विचारले असता संजय राऊत म्हणाले, "राहुल गांधींच्या विरोधात तक्रार करणे हा एक राजकीय डाव आहे. राहुल गांधींनी मोहब्बत की दुकान उघडले आहे. याची सुरूवात भारत जोडो यात्रेने झाली. लोक राहुल गांधींवर प्रेम करतात.

"राहुल गांधींनी एक प्रेमाच फ्लाईंग किस देशाच्या नावे दिलं. त्यात एवढं काय झालं? राहुल गांधींविरोधात सत्ताधारी सदस्य ज्या प्रकारे घोषणाबाजी करत होते, त्यावर राहुल गांधींनी एक प्रेमाचा कटाक्ष टाकला. हा जर महिलांच्या सन्मानाचा मुद्दा आहे तर या देशात महिलांवर अत्याचार होत आहेत. राहुल गांधींविरोधात तक्रार करणाऱ्या भाजपच्या खासदार महिलांनी कधी आवाज उठवला आहे का?" असा ही सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला.

Sanjay Raut Rahul Gandhi
Amit Shah Attack On Sharad Pawar : राज्यात सरकार पाडण्याची परंपरा शरद पवारांनी सुरू केली; अमित शाहांचा घणाघात

पंतप्रधानांवर टीका -

'अविश्वास प्रस्ताव - मणिपूर हिंसाचार यावर पंतप्रधानांच उत्तर ऐकण्यासाठी पूर्ण देश उत्सुक आहे. काल राहुल गांधींना पूर्ण देशाने ऐकलं. सत्ताधाऱ्यांची मणिपूरचा मुद्दा सोडून, इतर विषयांवरच चर्चा सुरू आहे. पंतप्रधानांनी सभागृहात आलं पाहिजे. आणि मणिपूरबाबत तुम्ही काय करत आहेत, हे सभागृहात सांगितलं पाहिजे. मणिपूर जळत असताना पंतप्रधान मोदी सभागृहात आले नाहीत, म्हणून अविश्वास प्रस्ताव आणला गेला," असं संजय राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com