Shashi Tharoor  sarkarnama
देश

Shashi Tharoor : शशी थरुर निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चात सहभागी, म्हणाले, राहुलजींचा प्रश्न महत्त्वाचा...

Shashi Tharoor Joins INDIA Alliance Morcha: निवडणूक आयोग मत चोरीसाठी भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप इंडिया आघाडीने केला आहे. इंडिया आघाडीच्या मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असताना त्यांना पोलिसांनी अडवले.

Roshan More

Shashi Tharoor News : मागील काही दिवासांपासून काँग्रेस पक्षापासून अंतर राखणारे खासदार शशी थरूर आज निवडणूक आयोगाच्या विरोधात काढलेल्या मोर्चात सहभागी झाले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात तब्बल 300 खासदार आणि 25 पक्ष सहभागी झाले आहेत. पोलिसांनी खासदारांचा मोर्चा अडवत ताब्यात घेतले.

मोर्चात सहभागी झालेले खासदार शशि थरुर म्हणाले, 'माझ्यासाठी हा मुद्दा अगदी सोपा आहे. राहुल गांधी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत; त्यांना उत्तरं मिळायलाच हवीत. निवडणूक आयोगाची जबाबदारी केवळ देशाप्रती नाही, तर स्वतःप्रती देखील आहे की आपल्या निवडणुकांच्या संपूर्ण विश्वासार्हतेबाबत जनतेच्या मनात कोणतेही शंका राहू नयेत.'

'निवडणुका हा संपूर्ण देशाचा विषय आहे. आपला लोकशाही हा इतका मौल्यवान आहे की बनावट मतदान, एकाच व्यक्तीची वेगवेगळ्या पत्त्यावर नोंद, किंवा खोटे मत असे प्रकार होतात का? याबाबतच्या शंकांमुळे तो धोक्यात येऊ नये. जर लोकांच्या मनात शंका असतील, तर त्या दूर केल्या पाहिजेत.', असे देखील थरुर यांनी म्हटले.

उत्तर द्यावेच लागेल...

शशी थरुर यांनी सांगितले की, जे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचे उत्तर विश्वासार्ह पद्धतीने दिली गेली पाहिजेत. माझी एकमेव विनंती म्हणजे निवडणूक आयोगाने हे प्रश्न गंभीरतेने घेतले पाहिजेत आणि त्यांना उत्तर दिले पाहिजे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT