Rahul Gandhi Congress  Sarkarnama
देश

Congress Politics : काँग्रेसमधील तीन बडे नेतेच राहुल गांधींच्या मतांशी असहमत; एका मुद्द्यावर पक्षात पडले दोन गट...

Shashi Tharoor, Karti Chidambaram, and Rajeev Shukla Criticize Trump’s Remark : खासदार शशी थरूर, राजीव शुक्ला आणि कार्ती चिदंबरम यांनी उघडपणे मीडियाशी बोलताना ट्रम्प यांच्या विधानाचा विरोध करत खडेबोलही सुनावले आहेत.

Rajanand More

Congress leaders on Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला मृत अर्थव्यवस्था म्हटले आहे. त्यानंतर देशांतर्गत राजकारण पुन्हा तापले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही भारत एक मृत अर्थव्यवस्था आहे, असे म्हणत आगीत तेल ओतण्याचे काम केले. पण आता या विधानावरून काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत.

एकीकडे राहुल गांधी ट्रम्प यांच्या विधानाचे समर्थन करत असताना पक्षातील नेतेच उघडपणे या विधानाचा विरोध करताना दिसत आहेत. शुक्रवारी खासदार शशी थरूर, राजीव शुक्ला आणि कार्ती चिदंबरम यांनी उघडपणे मीडियाशी बोलताना ट्रम्प यांच्या विधानाचा विरोध करत खडेबोलही सुनावले आहेत.

शशी थरूर यांनी संसदेच्या आवारात मीडियाशी बोलताना ट्रम्प यांच्या विधानाची दोन वाक्यातच त्यांचा दावा खोडून काढला. ‘असे अतिबात काही नाही, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, असे काहीही नाही,’ असे थरूर यांनी सांगत त्यावर फारसे बोलणेही टाळले.

कार्ती चिदंबरम यांनी ट्रम्प यांचे विधान फारसे गांभीर्याने घेऊ नये असे म्हटले आहे. ते शोमॅन आहेत. आपण दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्था असलेले देश आहोत. दोघांनाही एकमेकांची गरज आहे. ट्रम्प यांची शेल्फ लाईफ कमी आहे. 20 जानेवारी 2029 नंतर ते राष्ट्राध्यक्ष नसतील. पण दोन्ही देशांमधील संबंध शतकानुशतके राहणार आहेत, असे चिदंबरम म्हणाले आहेत.

ट्रम्प यांच्या विधानावर राजीव शुक्ला यांनी गुरूवारीच प्रतिक्रिया दिली होती. ट्रम्प यांचे म्हणणे चुकीचे आहे. भारतीय अर्थव्यवस्था मृत नाही पी. व्ही. नरसिंहराव आणि मनमनोह सिंग असतानाच आर्थिक सुधारणा झाल्या आङेत. अटल बिहारी वाजपेयींनी त्या सुधारणा पुढे नेल्या. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षात ती स्थिती मजबूत केली. सध्याचे सरकारही त्यावर काम करत आहे. आपली आर्थिक स्थिती अजिबात कमकुवत नाही, असे थेट विधान शुक्ला यांनी केले आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

राहुल गांधी यांना ट्रम्प यांच्या विधानाविषयी विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, ट्रम्प बरोबरच बोलत आहेत. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्याव्यतिरिक्त सगळ्यांना हे माहिती आहे. ट्रम्प खरे बोलल्याचा मला आनंद आहे. राहुल यांच्या या विधानाला आता त्यांच्या पक्षातूनही समर्थन मिळताना दिसत नाही. भाजपकडूनही राहुल गांधींच्या विधानावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT