RahuI Gandhi : आमच्याकडे अ‍ॅटम बॉम्ब, तो फुटला तर..! राहुल गांधींनी वात पेटवली, महाराष्ट्राबाबत लवकरच करणार मोठा धमाका?

RahuI Gandhi's Explosive Statement on Electoral Integrity : बिहारमधील मतदारयाद्यांची पुनर्पडताळणी असो की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक असो, राहुल गांधींकडून सातत्याने आयोगावर निशाणा साधला जात आहे.
Election Commission, Rahul Gandhi
Election Commission, Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Election Commission Under Fire : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. तसेच आयोगातील अधिकाऱ्यांनाही इशारा दिला आहे. आयोगाकडून मतांची चोरी केली जात आहे. त्याचे 'ओपन अॅन्ड शट' पुरावे आमच्याकडे असल्याचे राहुल यांनी ठणकावरून सांगितले.

बिहारमधील मतदारयाद्यांची पुनर्पडताळणी असो की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक असो, राहुल गांधींकडून सातत्याने आयोगावर निशाणा साधला जात आहे. ते म्हणाले, मतांच्या चोरीमध्ये निवडणूक आयोग सहभागी आहे. मी हे उगाच बोलत नाही. १०० टक्के पुराव्यांसह मी हे बोलत आहे. आम्ही हे पुरावे समोर आणले की संपूर्ण देशाला समजेल की, निवडणूक आयोग मतांची चोरी करत आणि कुणासाठी करत आहे?

निवडणूक आयोग भाजपसाठी हे करत आहे. हे 'ओपन अॅन्ड शट' आहे. याबाबत काही संभ्रम नाही. आम्हाला मध्य प्रदेशबाबत संशय होता. लोकसभेतही होता. महाराष्ट्रामध्ये आमचा संशय थोडा वाढला. राज्यस्तरावर मतांची चोरी झाल्याचे आम्हाला वाटले. एक कोटी मतदारांची नोंदणी झाली होती. आम्ही त्याच्या खोलात गेलो. पण आयोगाने आमची मदत केली नाही, असे राहुल म्हणाले.

Election Commission, Rahul Gandhi
Ajit Pawar : गडकरी, फडणवीसांसमोरच अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना डिवचलं; दोन दादांवरून निघालेला विषय पोहचला पालकमंत्रिपदापर्यंत...

आम्ही स्वत:च चौकशी केली. त्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. आम्हाला जे मिळालंय, तो अॅटम बॉम्ब आहे. हा फुटला तर तुम्ही हिंदुस्तानात निवडणूक आयोग कुठेही दिसणार नाही, असे मोठं विधान राहुल गांधींनी केले आहे. राहुल गांधी यांनी अत्यंत आक्रमकपणे हे विधान केल्याने नेमके त्यांच्याकडे कोणते पुरावे आहेत, याबाबत आता चर्चांना उधाण आले आहे.  

Election Commission, Rahul Gandhi
Modi Trump deal : मोदींच्या अमेरिका दौऱ्यावेळी ट्रम्प यांचा होता मोठ्या डीलचा प्रस्ताव; आता भारताकडून जोरदार झटका

मी हे खूप गंभीरपणे बोलत आहे की, निवडणूक आयोगात बसून जे कोणी हे काम करत आहेत, आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कारण तुम्ही देशाविरोधात काम करत आहात. हा राजद्रोह आहे. तुम्ही कुठेही असाल, निवृत्त व्हा किंवा काहीही असोत. आम्ही तुम्हाला शोधून काढू. कर्नाटकात याचा खुलासा करू, असे राहुल यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com