Shashi Tharoor responds to a question from his son, Ishaan Tharoor, regarding Pakistan's denial of involvement in the Pahalgam terror attack during a press briefing in Washington, D.C.  Sarkarnama
देश

Shashi Tharoor Son : अमेरिकेत पत्रकार लेकाकडून अडचणीत टाकणारा प्रश्न, शशी थरूर यांचेही थेट उत्तर!

Ishaan Tharoor's Question : ईशान असे थरूर यांच्या मुलाचे नाव आहे. वॉशिंग्टन डीसी येथे एका कार्यक्रमात हा प्रसंग घडला. ईशान हे एक पत्रकार आहेत.

Rajanand More

Pakistan's Alleged Support for Terrorism : ऑपरेशन सिंदूरवर भारताची भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ विविध देशांचा दौरा करत आहे. सध्या हे शिष्टमंडळ अमेरिकेत आहे. यादरम्यान एका कार्यक्रमात थरूर यांचा लेक त्यांच्यासमोर पत्रकार म्हणून उभा ठाकला. यावेळी थरूर यांनाही सुखद धक्का बसला.

ईशान असे थरूर यांच्या मुलाचे नाव आहे. वॉशिंग्टन डीसी येथे एका कार्यक्रमात हा प्रसंग घडला. ईशान हे एक पत्रकार आहेत. त्यांना वडिलांनाच प्रश्न विचारण्याची संधी यावेळी मिळाली. व्यक्तिगत क्षमता आणि तुम्हाला भेटण्याच्या बहाण्याने प्रश्न विचारण्याची मुभा मागतो, असे म्हणत खेळीमेळीच्या वातावरणात ईशान यांनी प्रश्न विचारला.

ईशान यांचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा होता. पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे कोणत्या देशाने भारताकडे मागितले का? कारण पाकिस्तान सातत्याने याबाबत आपला हात नसल्याचा दावा करत आहे, असा प्रश्न ईशान यांनी विचारला. त्यावर थरूर यांनी हसत या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरूवात केली. मला आनंद आहे की, तुम्ही हा प्रश्न विचारला, असे ते म्हणाले.

थरूर म्हणाले, इतर राष्ट्रांच्या कोणत्याही सरकारने पाकिस्तानविरोधात पुरावे मागितले नाहीत. खात्री पटल्यानंतरच भारताने कारवाई केली. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाचे समर्थन करत असल्याचे अनेक देशांना माहिती आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठवतो आणि नंतर हात वर करतो, असे थरूर यांनी स्पष्ट केले.

थरूर यांनी यावेळी ओसामा बिन लादेनचेही उदाहरण दिले. ओसामा बिन लादेन कुठे आहे, हे माहिती नसल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जात होतात. पण तो पाकिस्तानमध्येच कॅन्टोन्मेंट सिटीत एका आर्मी कॅम्पसमोर सुरक्षितस्थळी होता. अमेरिका हे कधीही विसरणार नाही, असे थरूर यांनी सांगितले.

मुंबई हल्ल्यावेळीही त्यांना हात झटकले होते. पण एक दहशतवादाला जिवंत पकडण्यात आले आणि त्याचे नाव, ओळख, पत्ता पाकिस्तानातील निघाला. सगळं काही समोर आलं. प्रशिक्षण कुठे मिळाले, याची माहितीच त्याने दिली. पाकिस्तान हँडलरकडून सूचना दिल्या जात होत्या, याचे पुरावे अमेरिका आणि भारताच्या गुप्तचर यंत्रणांकडे पुरावे आहेत. त्यामुळे पाकिस्तान काय आहे, हे सर्वांना माहिती असल्याचे उत्तर थरूर यांनी दिले. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT