Narendra Modi, Shashi Tharoor, Rahul Gandhi Sarkarnama
देश

Shashi Tharoor Politics : तुम्ही मोदी सरकारसाठी काम करता का? शशी थरुरांनी दिले स्मार्ट उत्तर

Shashi Tharoor Congress Narendra Modi : शशी थरूर म्हणाले, भारताने या वेळी जी कारवाई केली आहे त्यामधून स्पष्ट संदेश गेला आहे की आता दहशतवादाबाबत कुठलाही समजूतदारपणा दाखवला जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल.

Roshan More

Shashi Tharoor News : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये शस्त्रसंधी झाली. पाकिस्तानकडून दहशतवादावा पाठींबा देत असल्याबाबात त्यांचा पर्दाफाश करण्यासाठी भारताने सर्वपक्षीय शिष्टमंडळ परदेशी दौऱ्यावर पाठवले आहे. यामध्ये काँग्रेसचे खासदार शशी थरुर यांचे पक्षाने नाव न देता त्यांचा समावेश शिष्टमंडळात करण्यात आला. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ अमेरिकेत गेले होते

अमेरिकेत भारताची बाजू थरूर यांनी प्रभावीपणे मांडली. न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायासमोर थरूर यांना विचारण्यात आले की, तुम्ही नरेंद्र मोदी सरकारसाठी काम करता का? यावर उत्तर देताना शशी थरूर म्हणाले, 'मी सरकारसाठी काम करत नाही.मी विरोधी पक्षाचा सदस्य आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच मी एका वर्तमानपत्रात माझे विचार मांडले होते. त्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटले आहे की पाकिस्तानला फक्त प्रत्युत्तर देऊन चालणार नाही, तर हुशारीने उत्तर देणे आवश्यक आहे. मला आनंद आहे की भारताने यावेळी तशीच भूमिका घेतली आहे.'

शशी थरूर म्हणाले, भारताने या वेळी जी कारवाई केली आहे त्यामधून स्पष्ट संदेश गेला आहे की आता दहशतवादाबाबत कुठलाही समजूतदारपणा दाखवला जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल.

राहुल गांधींकडून जयशंकर टार्गेट

राहुल गांधी यांच्याकडून परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना टार्गेट केले जात आहे. जयशंकर यांनी पाकिस्तानकडून भारताचे विमान पाडल्याचे सांगितले होते. त्यावरून भारताचे किती विमान पाडले गेले हे जाहीर करा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. तसेच त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाताहत झाल्याची टीका केली. ते म्हणाले, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सांगण्यावरून शस्त्रसंधी झाली. त्यांना भारत पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास कोणी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT