Bhagwant Mann, Sukhvinder Sukhu Sarkarnama
देश

Shiromani Akali Dal : अकाली दल फुटीच्या उंबरठ्यावर; उरले फक्त दोन आमदार, ‘आप’ने दिला दणका

AAP Sukhvinder Kumar Sukhi Punjab : विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही शिरोमणी अकाली दलाला अपेक्षित यश मिळाले नाही.

Rajanand More

Chandigarh : पंजाबमधील शिरोमणी अकाली दल हा पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यातच या पक्षाला विरोधी पक्षांकडून धक्के देण्यास सुरूवात झाली आहे. अकाली दलाच्या तीन आमदारांपैकी एका आमदाराने बुधवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यामुळे दलाकडे आता केवळ दोनच आमदार उरले आहेत.

अकाली दलाकडून दोनदा निवडून आलेले आमदार सुखविंदर कुमार सुक्खी यांनी बुधवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या उपस्थित आपमध्ये प्रवेश केला. अकाली दलासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सुक्खी हे पेशाने डॉक्टर असून पहिल्यांदा 2017 मध्ये ते आमदार झाले. त्यानंतर 2022 च्या आपच्या लाटेतही त्यांनी विजय मिळवला.

2022 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाला केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. सुक्खी यांनी पक्ष सोडल्याने आता दोनच आमदार उरले आहेत. लोकसभा निवडणुकीतही पक्षाचा केवळ एकच उमेदवार विजयी झाला. बादल कुटुंबातील हरसिमरत कौर बादल निवडून आले.

लोकसभेनंतर अकाली दलामध्ये फुटीचे वारे जोरात वाहू लागले आहे. पक्षातील मोठ्या गटाने सुखबीर सिंह बादल यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. तसेच पक्षावरही दावा ठोकण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अशास्थितीत एका आमदाराने साथ सोडणे बादल कुटुंबासाठी झटका मानले जात आहे.

अकाली दलातील याच वादावर भगवंत मान म्हणाले होते की, ‘पंजाबमध्ये 25 वर्षे सत्ता उपभोगलेल्यांना 25 लोकांनाही सोबत घेऊन चालता येत नाही.’ फुटीच्या मुद्यावर अकाली दलाने भाजपकडे बोट दाखवले आहे. हरसिमरत कौर बादल यांनी फुटीमध्ये भाजपचा हात असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT