Shivsena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दिरंगाईसंदर्भातल्या याचिकांवरची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या या प्रकरणातील कार्यवाहीबाबत अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. (Latest Marathi News)
सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, विधानसभा अध्यक्ष यांनी नियोजित केलेले वेळापत्रक आम्हाला मान्य नाही. न्यायालयाने दिलेला आदेशाचा तुम्ही अवमान करत आहात. सुधारित वेळापत्रक हे येत्या मंगळवारपर्यंत जाहीर करा, असे आदेश देतानाच अध्यक्षांच्या पूर्वीच्या वेळापत्रकाला केराची टोपलीत टाकली आहे.
दोन महिन्यांत निर्णय घ्यावा -
"विधानसभा अध्यक्षांनी पुढील दोन महिन्यांत निर्णय घ्यावा,' असं सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय गांभीर्याने घेत आहे, याची नोंद घ्यावी. न्यायालयाच्या निकालाची अवहेलना होता कामा नये,' अशा स्पष्ट शब्दांत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले आहे.
विधानसभेचे अध्यक्ष आमदार अपात्रता प्रकरणात दिरंगाई करत आहेत, असे म्हणत उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकांवर एकत्र सुनावणीची प्रक्रिया पार पडत होती. यासाठी खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड तर ठाकरेंकडून खासदारअनिल देसाई सुनावणीसाठी उपस्थित होते.
(Edited by - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.