Madhya Pradesh BJP Sarkarnama
देश

Madhya Pradesh New CM : नवा चेहरा की शिवराजच ? मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्याबाबत आज होणार फैसला!

Shivrajsingh Chauhan : भाजपच्या आमदारांची भोपाळच्या पक्ष मुख्यालयात बैठक

Sunil Balasaheb Dhumal

Madhya Pradesh Political News : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री ठरले आहेत, आता मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडले, याची उत्सुकता आहे. मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्याबाबत आठवड्यापासून सुरू असलेली खल सोमवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत संपण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशचा नवा मुख्यमंत्री कोण, यावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. भाजपच्या आमदारांची आज दुपारी भोपाळच्या पक्ष मुख्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड होण्याची शक्यता आहे. बैठकीला केंद्रीय निरीक्षक म्हणून हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल, ओबीसी मोर्चाचे प्रमुख डॉ. लक्ष्मण आणि राष्ट्रीय सचिव आशा लाक्रा हे उपस्थित राहणार आहेत.

भाजपकडून निवडून आलेल्या सर्व 163 आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यात मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शिवराज सिंह चौहान यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होत की छत्तीसगडप्रमाणे नव्या चेहऱ्याला संधी मिळते, याकडे लक्ष आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मध्य प्रदेशात 'या' नावांची चर्चा

पक्षाने ओबीसी प्रवर्गातील एखाद्याला मध्य प्रदेशात मुख्यमंत्री बनवल्यास शिवराजसिंह चौहान, प्रल्हाद सिंह पटेल आणि भूपेंद्र सिंह यांच्यापैकी कोणाच्याही नावावर एकमत होऊ शकते, असे मानले जात आहे. त्याचप्रमाणे सर्वसाधारण प्रवर्गातून नरेंद्र सिंह तोमर, राकेश सिंग आणि विष्णू दत्त शर्मा यांच्या नावांना मंजुरी मिळू शकते. इतरांमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि राज्यसभा सदस्य सुमेर सिंह सोलंकी यांचीही नावे चर्चेत आहेत.

आमदारांना प्रतिक्रिया देण्यास मनाई

मध्य प्रदेश भाजप कार्यालयात नवीन आमदारांसाठी मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी 1 ते 3 या वेळेत आमदारांची नोंदणी व मेजवानी होणार आहे. तिन्ही निरीक्षक आमदारांसोबत जेवणही करणार आहेत. तीन वाजता विधीमंडळ पक्षाच्या सदस्यांचे सामूहिक छायाचित्रण होणार आहे. चार वाजण्याच्या सुमारास बैठक सुरू होईल. सर्व सदस्यांनी सभेपूर्वी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळावे असे सांगण्यात आले आहे. सोमवारी पक्षाचे राज्याचे प्रमुख पदाधिकारीही कार्यालयात उपस्थित राहणार आहेत.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT