Smriti Irani : रिकाम्या खुर्च्या पाहून स्मृती इराणींनी घेतला काढता पाय; मंचावर गेल्याच नाहीत

Bjp Political News: विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील हे त्यांची वाट पाहत कार्यक्रमस्थळी थांबून होते.
Smriti Irani
Smriti Irani Sarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेली अत्यल्प उपस्थिती अन् रिकाम्या खुर्च्या पाहून इराणी यांनी काढता पाय घेतला. त्यांनी मंचावर न जाणेच पसंत केले. उलट त्या हा कार्यक्रम अर्धवट सोडून सभा स्थळावरून निघून गेल्या. या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने त्या मंचावर गेल्या नसल्याचे समजते.

.

Smriti Irani
Shrikant Shinde : ''पाथरीत आता 'खान' अन् 'बाण' दोन्हीपण'' ; श्रीकांत शिंदेंचं विधान!

पुण्यात 'दो धागे-श्रीराम के लिए' या उपक्रमाच्या शुभारंभासाठी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या आल्या होत्या. हा कार्यक्रम मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नव्हती. त्यामुळे त्या मंचावर गेल्या नाहीत. त्या व्यासपीठाच्या खालीच काही वेळ थांबल्या व तेथनूच काढता पाय घेतला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या कार्यक्रमप्रसंगी स्मृती इराणी (Smriti Irani) या उपस्थित जनसमुदायला संबोधित करणार होत्या. त्यामुळे यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे त्यांची वाट पाहत कार्यक्रमस्थळी थांबून होते. मात्र, तत्पूर्वी स्मृती इराणी यांनी एफसी रोड वर दो धागे, श्रीराम के लिए या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर त्या मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर आल्या. मात्र, त्याठिकाणी अत्यल्प उपस्थिती अन रिकाम्या खुर्च्या पाहून इराणी मंचावर गेल्या नाहीत. उलट त्यांनी हा कार्यक्रममध्येच सोडून जाणं पसंत केले. त्या गाडीमध्ये बसून निघून गेल्या.

(Edited by Sachin Waghmare)

Smriti Irani
Smriti Irani On Sanatan : "जोपर्यंत भक्त जिवंत आहेत.." ; सनातन धर्मावर झालेल्या वक्तव्यानंतर स्मृती इराणी कडाडल्या..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com