Asim Sarode_Eknath Shinde_Uddhav Thackeray 
देश

Shivsena Case: "पुन्हा आशा पल्लवित झाल्या"; शिवसेनेच्या आजच्या सुनावणीबाबत असीम सरोदेंनी दिली अत्यंत महत्वाची माहिती

Shivsena Case: शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली.

Amit Ujagare

Shivsena Case: शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंचं की उद्धव ठाकरेंचं? या प्रलंबित प्रकरणात आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली. केवळ काही मिनिटेच ही सुनावणी झाली पण त्यात अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले. त्यानुसार, आता पुन्हा एकदा आशा पल्लवित झाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्यावतीनं खटला लढणारे आणखी एक वकील असीम सरोदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर आता पुढे काय होऊ शकतं? याची सविस्तर माहिती देखील त्यांनी दिली आहे.

असीम सरोदे म्हणाले, "आज चार मिनिटांसाठी सुनावणी झाली, ती देखील आमच्यासाठी महत्वाची वाटते. कारण आता एक आशा पल्लवित झाली की अतिमतः हे प्रकरण कोर्टात ऐकून घेतलं जाईल. आजच्या सुनावणीत ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं की, शिवसेना आमदार अपात्रतेचं प्रकरण ते ऐकून घेतलं पाहिजे कारण ते ऐकल्याशिवाय शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि इतर प्रकरणं लक्षात येणार नाही. कारण पक्षांतर जे झालेलं आहे योग्य की अयोग्य याबद्दला निर्णय आधी होणं आवश्यक आहे. १० शेड्युलनुसार पक्षाची फूट ही राजकीय पक्षात झालेली आणि विधीमंडळ पक्षातील झालेली फूट हे वेगळ्या आहेत.

यामध्ये विधीमंडळ पक्षात झालेला दुभंग हा महत्वाचा नसून राजकीय पक्षात झालेला दुभंग हा महत्वाचा आहे. राजकीय पक्ष मूळचा फुटलेला नाही, कारण सुरुवातीला विधीमंडळ पक्षच फुटला आणि त्याआधारेच हे सांगण्यात आलं की पक्षात फूट पडली आहे. त्यानंतर फुटलेल्या गटाचं दुसऱ्या पक्षात विलिनिकरण होणं गरजेचं होतं, पण एकनाथ शिंदेंसह सर्वांनी हे विलिनिकरणही केलं नाही. पण विलिनिकरण होणं हे जेव्हा हे लोक गुवाहाटीला गेले होते तेव्हाच व्हायला हवं होतं. कारण यानंतर विलिनिकरण होणं हे योग्य आहे की अयोग्य हा विषयची कोर्टाच्या विचाराधीन आहे.

सुप्रीम कोर्टाला आज सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या निर्णयाची आठवण करुन देण्यात आली ज्यात माजी सरन्यायाधीश चंद्रचूड आणि इतर चार न्यायाधीशांच्या खंडपीठानं म्हटलं होतं की, बहुमत हे विधीमंडळ पक्षाच्या आधारे ठरणार नाही, हे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं याची आठवण कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधिशांना करुन दिली. त्यावर ते म्हणाले की, आपण लवकरच यावर सुनावणी घेऊ. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्यावतीनं त्यांच्या वकिलांनी सांगितलं की, हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे. हा पक्षांतरबंदीचा मुद्दाच नाही. पण याच मुद्द्यावर सुनावणी झाली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. या सर्व मुद्द्यांवर ऐकून घेण्यासाठी कोर्टाच्या सोईची तारीख देण्यात येणार आहे.

त्यामुळं यावेळी कोर्टाला विनंती करण्यात आली की, सुनावणीची वेळ निश्चित करा. कारण थोडाच वेळ राहतो आणि सुनावणी होत नाही. त्यामुळं जेव्हा केव्हा आणि कोर्ट तारीख देईल तेव्हा मग २ वाजता सुनावणी ठेवण्यात येईल आणि ती संध्याकाळपर्यंत संपवण्यात येईल, असं कोर्टानं आश्वासन दिलं आहे. त्यामुळं आता ही सुनावणी नक्कीच पुढे जाईल, अशी सविस्तर माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT