Rahul Gandhi: अजित पवारांना न्यायासाठी आता राहुल गांधी मैदानात! भेटीनंतर रोहित पवारांनी सांगितली स्ट्रॅटेजी

Rahul Gandhi: अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा विषय रोहित पवार यांनी सातत्यानं लावून धरला आहे. आता हा विषय अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत.
Rohit Pawar_Ajit Pawar_Rahul Gandhi
Rohit Pawar_Ajit Pawar_Rahul Gandhi
Published on
Updated on

Rahul Gandhi Fights For Ajit Pawar: अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा विषय रोहित पवार यांनी सातत्यानं लावून धरला आहे. आता हा विषय अधिक व्यापक पातळीवर नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी दिल्लीत जाऊन त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेतली आणि त्यांना या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेत नेमका काय निर्णय झाला याची माहिती रोहित पवार यांनी पत्रकारांना दिली.

Rohit Pawar_Ajit Pawar_Rahul Gandhi
Shivsena Case: शिवसेना पक्ष अन् चिन्ह प्रकरण : सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली; सरन्यायाधिशांसमोर काय काय घडलं?

रोहित पवार म्हणाले, अजित पवारांच्या अपघाती मृत्यूसंबंधीची सर्व माहिती राहुल गांधींना सांगितली त्यानंतर हा विषय थोडा खोलात जाऊन समजून घ्यावा लागेल असंही सांगितलं. त्याचबरोबर हा विषय तात्काळ चर्चेसाठी घ्यावा अशी विनंती केली त्यावर राहुल गांधींनी त्यांना अजित पवारांच्या मृत्यूशी संबंधित आक्षेपाचे मुद्दे संसदेत मांडण्याचं आश्वासन दिलं. पण आत्ता लगेच नाही कारण भारताला मोठ्या प्रमाणावर सध्या इंधनाची आणि गॅसची अडचण आलेली आहे. हा मुद्दा कालच्याच बैठकीत आम्ही घेतलेला आहे. पण याचबरोबर जर अजित पवारांचा विषयही जर घेतला तर दोन्ही विषयांकडं लक्ष जाणार नाही. त्यामुळं टप्प्याटप्प्यानं या मुद्द्यावर आवाज उठवायला लागेल. पण अजित पवारांना न्याय देण्यासाठी जसं मी आणि महाराष्ट्र लढत आहे तसंच काँग्रेस देखील लढेल असं राहुल गांधी यांनी आम्हाला सांगितलं.

राज्य शासनाकडून अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीचा प्रस्ताव सीबीआयकडं देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडं प्रस्ताव पाठवला आहे. पण तो अद्याप पोहोचला आहे की नाही? सीबीआय यावर कधीपासून तपास सुरु करणार? या प्रश्नांची उत्तरं देताना रोहित पवार म्हणाले, अजूनपर्यंत महाराष्ट्राकडून तो प्रस्ताव दिल्लीला सीबीआयकडं पाठवलेला नाही. आम्हाला खरंतर आश्चर्य वाटतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता की, आम्ही प्रस्ताव पाठवू पण तो अद्याप पाठवलेला नाही. आम्हाला असं कळालं होतं की प्रस्ताव पाठवण्यासाठी अजित पवारांच्या पक्षाच्या प्रमुखांनी ही विनंती केली होती.

Rohit Pawar_Ajit Pawar_Rahul Gandhi
Panchayat Samiti politics: सत्तास्थापनेवरून महायुतीत 'महाभारत'! 24 तासांत भाजपला 3 मोठे धक्के; विरोधात मित्रपक्षांनीच शड्डू ठोकला!

यासंदर्भात पहिलं पत्र आणि एक स्मरणपत्र देखील दिलं होतं पण तरीदेखील जर तो दिल्लीत येत नसेल तर तुम्ही समजून घ्या सत्तेत बसलेले लोक अजित पवारांना न्याय देण्यासाठी काय प्रकारची ताकद दाखवत आहेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्र्यांनी सीबीआयला प्रस्ताव दिला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तो स्विकारण्यात आला होता. पण अजित पवारांच्या मृत्यूबाबतचा प्रस्ताव अद्याप सीबीआयनं स्विकारलेला नाही. अजित पवारांच्या मृत्यूला २६ दिवस उलटून गेल्यानंतरही ही परिस्थिती आहे, असंही यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांच्या मृत्यूच्या सरकारी चौकशीबाबत माहिती दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com