Sanjay Raut , Gulabrao Patil
Sanjay Raut , Gulabrao Patil  Sarkarnama
देश

Gulabrao Patil's On Sanjay Raut: ..नाहीतर तोच कांदा हाणून मारीन; गुलाबराव पाटील राऊतांवर भडकले, 'आधी मत परत..

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics: ठाकरे गटाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (रविवारी) मालेगावात सभा झाली. या सभेला ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खरै आदी उपस्थित होते.

यावेळी संजय राऊतांनी शिंदे गटातील आमदारांवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी सुहास कांदे, गुलाबराव पाटील यांच्यावर राऊतांनी जहरी टीका केली.

राऊत म्हणाले, "महाराष्ट्रातील शेतकर्‍यांचे, बेरोजगारांचे, कष्टकर्‍यांचे प्रश्न सोडवायचे आहेत. कांद्याला भाव मिळत नाही. मात्र, आपल्याला सुहास कांदेंना रस्त्यावर फेकून कांद्याला भाव द्यायचाय. गुलाबराव पाटील यांना रस्त्यावर फेकायचंय. गद्दारांना धडा शिकवायचा आहे. गद्दारांना खोक्यांखाली चिरडायचे आहे. ज्या कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून संयुक्त महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांचेच वारस येथे बसले आहेत.

राऊतांच्या या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाटलांनी संजय राऊतांना जशास तसे उत्तर दिले आहे. वावडदा (जि.जळगाव) येथील विविध विकास कामांचे उद्धघाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

गुलाबराव पाटलांनी राऊतांचा उल्लेख यांना एकेरी उल्लेख केला. ते म्हणाले, "अरे मिंधे, आम्ही दिलेले आधी मत वापस कर. त्यानंतर गुलाबराव पाटील यांच्यावर टीका कर नाहीतर तोच कांदा तुझ्या तोंडावर हाणून मारीन,"

"संजय राऊत यांच्यासारख्या माणसाला माझ्यावर टीका करावी लागते म्हणजे मी छोटा माणूस नाही. दगड कोणत्या झाडाला मारले जातात की ज्याला फळ आहेत, मला फळ लागली आहेत, त्यामुळेच राऊत माझ्यावर टीका करीत आहेत," असे गुलाबराव पाटील म्हणाले.

राऊत काल म्हणाले होते की महाराष्ट्रात आता नवीन वारे सुरू झाले आहे. शिवसेना हललेली नाही, तुटलेली नाही आणि झुकलेलीदेखील नाही, आमचे चिन्ह, नाव काढुन घेतले आहे. मात्र, तरीही बाळासाहेबांनी स्थापलेली शिवसेना कुठेही कमी झालेली नाही. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवून कष्टकरी व शेतकरी, बेरोजगांना न्याय मिळवून देऊ.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT