Narendra Modi, Sanjay Raut Sarkarnama
देश

Sanjay Raut on PM Modi : मोदींना लोकसभेची निवडणूक सोपी राहिलेली नाही, नेहरू वंशातील एक "गांधी" त्यांच्या विरोधात उभा..

सरकारनामा ब्यूरो

New Delhi : 'सामना'माझ्यावर सातत्याने टीका करतो," असा नाराजीचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच काढला होता, यावर 'सामना'तील 'रोखठोक'मधून खासदार संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला आहे.

'सामना'बाबत मोदींचा नाराजीचा सूर तितकासा बरोबर नाही. फडणवीस नेहमी सांगतात, आम्ही 'सामना'वाचत नाही, पण त्यांचे सर्वोच्च बॉस 'सामना'ची दखल घेतात. व त्यावर भाष्य करतात, हे चांगल्या नेत्याचे लक्षण आहे. टीकाकारांचे विचार समजून घेतले पाहिजेत, हीच खरी लोकशाही. मोदींवर कधीच व्यक्तिगत किंवा खालच्या पातळीवरची टीका 'सामना'ने कधीही केली नाही," असे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

"राहुल गांधी पुन्हा संसदेत पोहोचले व अविश्वास ठरावाच्या चर्चेत त्यांनी जोरदार हल्ले केले. ९ आँगस्टच्या क्रांतीदिनी नेहरू वंशातील एक "गांधी" मोदी-शाहांच्या मनमानी सत्तालोलुपतेविरोधात उभा राहिलेला देशाने पाहिला. मोदी यांना २०२४ ची निवडणूक सोपी राहिलेली नाही,"असा इशारा राऊतांनी दिला आहे. "देश परिवर्तनाच्या दिशेने निघाला आहे. २०२४च्या विजयी लढाईचे रणशिंग फुंकण्यात आले आहे," असे राऊत यांनी म्हटलं आहे.

"भाजपमध्ये मोदीनाम व दंगलीशिवाय दुसरे एखादे प्रॉडक्ट असेल तर त्यांनी ते बाजारात आणावे. या प्रॉडक्टची 'एक्सपायरी डेट' 2024 पर्यंत आहे व त्यानंतर भारताचा राजकीय बाजार पूर्णपणे बदललेला असेल," अशी टीका नुकतीच अग्रलेखातून करण्यात आली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सव्वादोन तासांच्या भाषणात मणिपूरवर फक्त चार मिनिटे बोलले. बाकी सर्व पुराण तेच तेच आणि तेच त्यांनी काँग्रेसवरच लावले. या त्यांच्या मानसिक यातना आहेत. पंडित नेहरूंचे जागतिक मोठेपण, काँग्रेसचे स्वातंत्र्य लढ्यातील कार्य या मोदींच्या यातना आहेत व दहा वर्षे सत्ता भोगूनही मोदी यातनांतून दूर होऊ शकलेले नाहीत. मणिपूर समस्येचे खापर त्यांनी पंडित नेहरूंवर फोडले, असा आरोप 'सामना'तून करण्यात आला आहे.

Edited By : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT