Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दोघांचा डोळा कसा ? आम्ही बेअक्कल आहोत का ? अजितदादांची टोलेबाजी...

Chandni Chowk Bridge Inauguration : आम्ही बोललो नाही तर एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही,"
Maharashtra Politics  cm news
Maharashtra Politics cm news Sarkarnama
Published on
Updated on

Pune : अजित पवार यांची शिंदे-फडणवीस सरकारमध्ये 'एन्ट्री' झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे सांगत विरोधकांकडून अजितदादांना डिवचले जाते. मुख्यमंत्री आणि अजितदादांमध्ये 'कोल्ड वॉर' सुरु असल्याची टीका करणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा समाचार अजितदादांनी घेतला.

पुण्यातील चांदणी चौक पूल उद्घाटन सोहळ्यात अजित पवार बोलत होते. वडेट्टीवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून सरकारला टोले लगावले होते. पटोलेंच्या टीकेलाही अजितदादांनी उत्तर दिले.

Maharashtra Politics  cm news
Chandni Chowk Inauguration : पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार ; गडकरींची मोठी घोषणा, 'स्काय वॉक बस' आणणार

त्यांना कुठे 'कोल्ड वॉर' दिसलं ?

"आता कुठे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांना कुठे 'कोल्ड वॉर' दिसलं ? एकाला वाटते की या दोन उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रिपदाच्या एका खुर्चीवर डोळा आहे. अरे आम्ही काय बेअक्कल आहोत काय? खुर्ची एक असेल तर दोघांनी डोळा ठेवून कसे चालेल ? आणि ती खुर्ची भरलेली आहे, त्यावर व्यक्ती बसलेली आहे. मला हे खरंतर काढायचे नव्हते. पण काय होते, आम्ही बोललो नाही तर एकच बाजू लोकांना दिसते, दुसरी बाजू दिसत नाही," असा टोला त्यांनी वडेट्टीवार, पटोले यांना यांचे नाव न घेता लगावला.

Maharashtra Politics  cm news
Chandni Chowk Inauguration : 'चांदणी चौका' वरून 'लेटर बॉम्ब' टाकणाऱ्या मेधा कुलकर्णींचे नाराजीनाट्य संपले ?

त्यात चुकले काय ?

"राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदेंचे चांगले काम सुरू आहे. त्यांच्या जोडीला एका बाजूला देवेंद्र फडणवीस होते , दुसरी बाजू मोकळी होती. मी आता तिथे जाऊन उभा राहिलो. आम्ही दोघंही त्यांच्याबरोबर आहोत. त्यात चुकले काय ? राज्याचा सर्वांगिण विकास होत असेल, केंद्रातून नितीन गडकरी आणि पंतप्रधान नरेंद्र एका बाजूला का राज्याचा विकास करायचा नाही? असा सवाल अजितदादांनी विरोधकांना केला. चुकीच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवरही अजितदादांनी नाराजी व्यक्त केली.

पुण्यातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी डबल डेकर पूल तयार करण्याचा 'प्लॅन' नितीन गडकरी यांनी तयार केला आहे. यामुळे पुणे शहर वाहतूककोंडी मुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com